तूरडाळ किलोमागे १० रुपयांनी वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:21 IST2021-02-23T04:21:16+5:302021-02-23T04:21:16+5:30

चौकट - टमाटा ५ रुपये किलो बाजार समितीत कांदा भाव खात असताना इतर भाज्यांना मात्र अपेक्षित दर मिळत नाही. ...

Turdal rose by Rs 10 per kg | तूरडाळ किलोमागे १० रुपयांनी वाढली

तूरडाळ किलोमागे १० रुपयांनी वाढली

चौकट -

टमाटा ५ रुपये किलो

बाजार समितीत कांदा भाव खात असताना इतर भाज्यांना मात्र अपेक्षित दर मिळत नाही. टमाटा पाचपासून १२ रुपये किलोपर्यंत आहे.

चौकट -

साखर स्थिर

किराणा बाजारात सोयाबीन, सनफ्लॉवर या खाद्य तेलाच्या किमतीमध्ये वाढ झाली आहे. त्याचबरोबर डाळींचेही दर वाढले असून साखरेचे भाव मात्र स्थिर आहेत.

चौकट -

लालबाग २०० रु किलो

फळबाजारात द्राक्ष, आंबा या पिकांचे आगमन झाले असून या फळांना चांगली मागणी आहे. लालबागचा आंबा २०० किलो तर साेनाका काळी, प्लेन द्राक्ष ९० ते १०० रुपये किलो आहेत. सफरचंदाच्या भावातही वाढ झाली आहे.

कोट -

किराणा बाजारात तेजी आली असली तरी ग्राहकी मात्र काही प्रमाणात कमी झाली आहे. आवक कमी झाल्याने डाळींचे भाव वाढले आहेत. खाद्य तेल आयात केले जात असल्याने त्याचा दरवाढीवर परिणाम झाला आहे. - शेखर दशपुते, किराणा व्यापारी

कोट -

बाजारात दिवसागणिक भाज्यांचे भाव कमी होत आहेत मात्र खत, बी-बियाणे, औषधे यांच्या किमती काही कमी हाेत नाहीत, त्यामुळे शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च वाढतच आहे. - ज्ञानेश्वर तांदळे, शेतकरी.

कोट -

पेट्रोल-डिझेलसह सर्वच वस्तूंचे भाव वाढत असून महागाईचा भडका उडाला आहे. यामुळे सर्वसामांन्यांना जगणे मुश्कील झाले आहे. शासनाने दरवाढ कमी करायला हवी - रंजना देवरे, गृहिणी

Web Title: Turdal rose by Rs 10 per kg