विश्व कल्याणासाठी तुलसी अर्चन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2018 01:34 IST2018-06-11T01:34:54+5:302018-06-11T01:34:54+5:30

पंचवटी: जुना आडगाव नाक्यावरील श्री पंचमुखी हनुमान मंदिरात विश्व कल्याण व नाशिकच्या सुख समृद्धीसाठी रविवारी (दि.१०) पुरुषोत्तममास निमित्ताने सकाळी कमला एकादशीला श्री पुरुषोत्तम देवतास अकराशे कमळ फूल, अकराशे आंबे, तुलसी अर्चन, सहस्रनाम जपाने अर्पण करण्यात आले.

 Tulsi Urchin for world welfare | विश्व कल्याणासाठी तुलसी अर्चन

विश्व कल्याणासाठी तुलसी अर्चन

पंचवटी: जुना आडगाव नाक्यावरील श्री पंचमुखी हनुमान मंदिरात विश्व कल्याण व नाशिकच्या सुख समृद्धीसाठी रविवारी (दि.१०) पुरुषोत्तममास निमित्ताने सकाळी कमला एकादशीला श्री पुरुषोत्तम देवतास अकराशे कमळ फूल, अकराशे आंबे, तुलसी अर्चन, सहस्रनाम जपाने अर्पण करण्यात आले.
विविध ११ पदार्थ अकराशेच्या संख्येने देवाला मंत्रोच्चारात अर्पण केल्यानंतर महापूजा व महाआरती करण्यात आली. मंदिराचे महंत भक्तिचरणदास यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. येत्या मंगळवारी (दि.१२) भाविकांसाठी मंदिरात महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.

Web Title:  Tulsi Urchin for world welfare