घरोघरी पारंपरिक पद्धतीने तुलसी विवाहाला सुरुवात
By Admin | Updated: November 23, 2015 23:57 IST2015-11-23T23:57:36+5:302015-11-23T23:57:58+5:30
घरोघरी पारंपरिक पद्धतीने तुलसी विवाहाला सुरुवात

घरोघरी पारंपरिक पद्धतीने तुलसी विवाहाला सुरुवात
नाशिक : तुळशीच्या माध्यमातून भगवंताला आवाहन करण्यासाठी तुलसी विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात येते. कार्तिक शुक्ल पक्षातील एकादशीपासून तुलसी विवाह उत्सवाचे आयोजन करण्यात येते. कार्तिक ी एकादशी ते कार्तिकी पौर्णिमा अर्थात त्रिपुरारी पौर्णिमेपर्यंत हा तुलसी विवाह उत्साहात साजरा करण्यात येतो.
तुळशीचा विवाह सर्वत्र गोरज मुहूर्तावरच साजरा केला जातो. सूर्यास्ताची निश्चित वेळ माहिती नसल्याने सायंकाळी ६.३० ही प्रमाण वेळ मानून या विवाह सोहळ्याला सुरुवात करण्यात येत असल्याची माहिती अभ्यासक संदीप केंगे यांनी दिली.
हिंदू धर्मातील पारंपरिक पद्धतीने सामान्य व्यक्तीचा लग्न सोहळ्याप्रमाणेच तुळशीचा विवाह समारंभ संपन्न होतो.
नाशिक शहरातही विविध मंडळांकडून तुलसी विवाहाचे मोठ्या प्रमाणात आयोजन करण्यात आले असून, रविवार पेठेतील सुंदरनारायण मंदिर येथे मंगळवारी (दि. २४) सायंकाळी सात वाजता हा तुळसी विवाह संपन्न होणार आहे. यानंतरच लग्नांचा मौसम सुरू होत असतो. (प्रतिनिधी)