तुळजाभवानी कला, क्रीडा मंडळातर्फे गौरव
By Admin | Updated: July 15, 2014 00:53 IST2014-07-15T00:09:20+5:302014-07-15T00:53:34+5:30
तुळजाभवानी कला, क्रीडा मंडळातर्फे गौरव

तुळजाभवानी कला, क्रीडा मंडळातर्फे गौरव
नाशिक : तुळजाभवानी सांस्कृतिक कला व क्रीडा मंडळाच्या वतीने नुकताच गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. शिवसेना संपर्कप्रमुख रवींद्र मिर्लेकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
इयत्ता दहावी, बारावी, तसेच विविध स्पर्धा परीक्षांमध्ये यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा गौरव समारंभ गंजमाळ रोटरी हॉल येथे आयोजित करण्यात आला होता. यावेळी खासदार हेमंत गोडसे, पोलीस उपआयुक्त संदीप दिवान, डॉ. अनिरुद्ध धर्माधिकारी, चंदुलाल शाह उपस्थित होते. त्यांनी यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
माजी महापौर विनायक पांडे, अजय बोरस्ते, सुधाकर बडगुजर, दत्ता गायकवाड आदिंसह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. यावेळी मिर्लेकर यांनी गुणवंत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना यशाची पताका अशीच फडकावत ठेवा, असे सांगितले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते सुमारे २०० विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे आयोजन शिवसेना उपविभागप्रमुख नाना काळे यांनी केले होते. (प्रतिनिधी)