शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

तुकाराम मुंढे यांची ‘तणाव व्यवस्थापन कार्यशाळा’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2018 01:08 IST

महापालिकेत कामाच्या अतिताणाची चर्चा सुरू असतानाच आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सोमवारी (दि.१३) खातेप्रमुखांच्या बैठकीत माझ्यामुळे कामाचा ताण वाटतो काय? असा प्रश्न करीत वर्ग घेतला. त्याचप्रमाणे कर्मचाऱ्यांच्या देखील बैठका घेण्याच्या सूचना केल्या आहेत.

नाशिक : महापालिकेत कामाच्या अतिताणाची चर्चा सुरू असतानाच आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सोमवारी (दि.१३) खातेप्रमुखांच्या बैठकीत माझ्यामुळे कामाचा ताण वाटतो काय? असा प्रश्न करीत वर्ग घेतला. त्याचप्रमाणे कर्मचाऱ्यांच्या देखील बैठका घेण्याच्या सूचना केल्या आहेत.  फेबु्रवारी महिन्यात नाशिकमध्ये आयुक्त तुकाराम मुंढे यांचे आगमन झाल्यापासून कामाचा ताण त्यांच्या कारकिर्दीत वाढला, असा आरोप करण्यात येत आहे. वेळेपेक्षा अधिक वेळ काम करावे लागते, त्याचप्रमाणे महापालिकेच्या अ‍ॅपवर तक्रारी केल्यानंतरही तातडीने त्याचे निराकरण करावे लागते अन्यथा टांगती तलवार असते, असेही सांगितले जाते. नोटिसांचा मारा सहन करावा लागतो अशीही तक्रार असून, त्याचपार्श्वभूमीवर अलीकडेच म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेच्या वतीने आयुक्त तुकाराम मुंढे यांना नोटीस बजावली आहेत.  कामाच्या ताणामुळे नगररचना विभागाचे अभियंता रवि पाटील हे बेपत्ता झाले होते, तर सहायक अधीक्षक संजय दादा धारणकर याने आत्महत्या केली होती. त्या पार्श्वभूमीवर हा विषय अधिक ताणला गेला असून, महापालिकेत मान्यताप्राप्त कर्मचारी संघटनेने नोटिसा बजावल्याने हा विषय अधिक अडचणीचा ठरला आहे. त्या पार्श्वभूमीवर आयुक्तांनी सोमवारी (दि.१३) खातेप्रमुखांच्या बैठकीत कोणाला ताण टळावा का? असा प्रश्न करून आपल्यामुळे ताणतणाव असेल तर थेट मला सांगा असे सांगितल्याचे वृत्त आहे. मात्र अधिकाºयांनी उत्तर दिले  नसल्याचे समजते. त्याचप्रमाणे कर्मचाºयांच्या बैठका घेऊन त्यांनादेखील कामाचा किती ताणतणाव आहे याबाबत चौकशी करण्यास सांगितले आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाtukaram mundheतुकाराम मुंढे