शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
2
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
3
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
4
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
5
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
6
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
7
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
8
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
9
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
10
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
11
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
12
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
13
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
14
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
15
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
16
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
17
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
18
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
19
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
20
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?

नाशिकमध्ये तुकाराम मुंढे यांची तणाव व्यवस्थापन कार्यशाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2018 16:10 IST

नाशिक : महापालिकेत कामाच्या अतिताणाची चर्चा सुरू असतानाच आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सोमवारी (दि.१३) खातेप्रमुखांच्या बैठकीत माझ्यामुळे कामाचा ताण वाटतो काय? असा प्रश्न करीत वर्ग घेतला. त्याचप्रमाणे कर्मचा-यांच्यादेखील बैठका घेण्याच्या सूचना केल्या आहेत.

ठळक मुद्देकर्मचाऱ्यांवर ताण असल्याचा होतो आरोपअधिका-यांना केली विचारणायशदामार्फत तणाव व्यवस्थापनाचे धडे

नाशिक : महापालिकेत कामाच्या अतिताणाची चर्चा सुरू असतानाच आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सोमवारी (दि.१३) खातेप्रमुखांच्या बैठकीत माझ्यामुळे कामाचा ताण वाटतो काय? असा प्रश्न करीत वर्ग घेतला. त्याचप्रमाणे कर्मचा-यांच्यादेखील बैठका घेण्याच्या सूचना केल्या आहेत.

फेबु्रवारी महिन्यात नाशिकमध्ये आयुक्त तुकाराम मुंढे यांचे आगमन झाल्यापासून कामाचा ताण त्यांच्या कारकिर्दीत वाढला असा आरोप करण्यात येत आहेत. वेळेपेक्षा अधिक वेळ काम करावे लागते, त्याचप्रमाणे महापालिकेच्या अ‍ॅपवर तक्रारी केल्यानंतरही तातडीने त्याचे निराकरण करावे लागते अन्यथा टांगती तलवार असते, असेही सांगितले जाते. नोटिसांचा मारा सहन करावा लागतो अशीही तक्रार असून, त्याचपार्श्वभूमीवर अलीकडेच म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेच्या वतीने आयुक्त तुकाराम मुंढे यांना नोटीस बजावली आहेत. कामाच्या ताणामुळे नगररचना विभागाचे अभियंता रवि पाटील हे बेपत्ता झाले होते, तर सहायक अधीक्षक संजय दादा धारणकर याने आत्महत्या केली होती.

त्या पार्श्वभूमीवर हा विषय अधिक ताणला गेला असून, महापालिकेत मान्यताप्राप्त कर्मचारी संघटनेने नोटिसा बजावल्याने हा विषय अधिक अडचणीचा ठरला आहे. त्या पार्श्वभूमीवर आयुक्तांनी सोमवारी (दि.१३) खातेप्रमुखांच्या बैठकीत कोणाला ताण टळावा का? असा प्रश्न करून आपल्यामुळे ताणतणाव असेल तर थेट मला सांगा असे सांगितल्याचे वृत्त आहे. मात्र अधिकाºयांनी उत्तर दिले नसल्याचे समजते. त्याचप्रमाणे कर्मचा-यांच्या बैठका घेऊन त्यांनादेखील कामाचा किती ताणतणाव आहे याबाबत चौकशी करण्यास सांगितले आहे......तणाव आणि तणाव व्यवस्थापनमहापालिकेच्या वतीने सध्या कर्मचाºयांना यशदाच्या माध्यमातून प्रशिक्षण दिले जात आहे, परंतु त्याचबरोबर तणाव व्यवस्थापनाचे धडेही दिले जात आहेत, असेही सांगण्यात येत आहे.

टॅग्स :Nashikनाशिकtukaram mundheतुकाराम मुंढे