तुकाराम दिघोळे यांना जीवनगौरव

By Admin | Updated: September 26, 2016 00:50 IST2016-09-26T00:49:33+5:302016-09-26T00:50:22+5:30

सिन्नर : कन्सल्टिंग सिव्हिल इंजिनिअर्स असोसिएशनच्या वतीने सन्मान

Tukaram Dighole is a lifelong lifer | तुकाराम दिघोळे यांना जीवनगौरव

तुकाराम दिघोळे यांना जीवनगौरव

सिन्नर : कन्सल्टिंग सिव्हिल इंजिनिअर्स असोसिएशनच्या वतीने माजी राज्यमंत्री तथा इंजिनिअर तुकाराम दिघोळे यांना जीवनगौरव पुरस्काराने गौरविण्यात आले.
नाशिक येथे झालेल्या कार्यक्रमास व्यासपीठावर सतीश साळपेकर, संस्थेचे अध्यक्ष विजय सानप, सचिव संतोष काठे, सहसचिव अनिल कडभाने, ज्ञानेश्वर गोडसे, खासदार हेमंत गोडसे, खजिनदार महेंद्र शिरसाठ आदि मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते सरस्वती व भारतरत्न मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या, असोसिएशनच्या नाशिक शाखेचे संस्थापक शिवाजी खोडे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
यावेळी खासदार हेमंत गोडसे यांचाही संस्थेचे माजी राष्ट्रीय उपाध्यक्ष हेमंत धात्रक यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. संस्थेचे अध्यक्ष सानप यांनी कन्सल्टिंग सिव्हिल इंजिनिअर्स असोसिएशनच्या कार्याची माहिती दिली. गोडसे यांनी नाशिक जिल्ह्यात सुरू असलेल्या कामांची माहिती दिली.  गृहनिर्माण क्षेत्रातील उणिवा व भवितव्य याबाबत मान्यवरांनी मते व्यक्त केली. सामान्य जनतेला अपेक्षीत घरांचे प्रमाण कमी होऊन मोठ्या बजेटची सर्वसुविधायुक्त घरांची संख्या वाढल्याने बांधकाम क्षेत्रात मंदी आल्याने प्रतिपादन मान्यवरांनी यावेळी व्यक्त केले. सामान्यांना परवडतील अशा दरात घरे निर्माण करण्याचे आवाहन बांधकाम व्यावसायिकांना यावेळी करण्यात आले.  याप्रसंगी सुनील कुटे, गुणवंत चौधरी, रवी अमृतकर, अमीत अलई, प्रशांत पाटील, अनिल कडभाने, लीलाधर जावळे, सचिन भागवत आदिंसह इंजिनीअर मोठ्या संख्येने उपस्थित होते. पुनीत राय यांनी सूत्रसंचालन केले. संतोष काठे यांनी आभार मानले.
(वार्ताहर)
तुकाराम दिघोळे यांना मान्यवरांच्या हस्ते शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. डिप्लोमा गटातील निखिल वाघ, सिद्धांत कंकरेज, कशिश विग तर पोस्ट ग्रॅज्युएशन गटात आकांक्षा पिसोलकर यांना प्रथम क्रमांक मिळविल्याबद्दल कै. शिवाजीराव खोडे मेमोरियल अवॉर्डने गौरविण्यात आले. सिन्नर येथील इंजिनिअर समाधान गायकवाड यांना मेंबरशिप चॅम्पियन पुरस्काराने साळपेकर यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
 

Web Title: Tukaram Dighole is a lifelong lifer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.