घोटी-सिन्नर रस्त्यावर ताडी विक्र ी
By Admin | Updated: February 6, 2016 22:16 IST2016-02-06T22:12:15+5:302016-02-06T22:16:07+5:30
घोटी-सिन्नर रस्त्यावर ताडी विक्र ी

घोटी-सिन्नर रस्त्यावर ताडी विक्र ी
घोटी : घोटी-सिन्नर रस्त्यावर धामणी शिवारात असलेल्या एका हॉटेललगत गेल्या काही महिन्यांपासून ताडी विक्रीचे दुकान हॉटेलमालकाने
थाटले असून या ताडी विक्री केंद्रामधून विक्री होणाऱ्या ताडीमुळे हजारो
युवक व्यसनाधीन झाले असल्याने हे अवैध ताडी विक्री केंद्र बंद करावे,
अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून विशेषत: महिला वर्गाकडून होत आहे.
दरम्यान घोटी-सिन्नर रस्त्यावर गेल्या अनेक महिन्यांपासून हा व्यवसाय सर्रासपणे चालू असताना स्थानिक पोलीस व उत्पादन शुल्क अधिकारी याकडे दुर्लक्ष करीत असल्याने पोलिसांच्या कार्यप्रणालीवर संशय व्यक्त होत आहे.
घोटी-सिन्नर रस्त्यावर धामणी शिवारात हॉटेलचालकाने ताडी विक्रीचे विनापरवाना विक्री केंद्र थाटले आहे. या विक्री केंद्रातून दररोज हजारो लिटर विषारी ताडी विक्री होत असून, यामुळे या भागातील हजारो युवक व्यसनाधीन होऊन संसार उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहेत.
याबाबत या परिसरातील नागरिकांनी आणि महिलांनी घोटी पोलिसांकडे अनेकदा तक्र ारी करूनही दखल घेतली जात नसल्याने या भागातील महिलावर्ग त्रस्त झाला आहेत. दरम्यान, ही अवैध ताडी विक्री तत्काळ बंद करावी, अशी मागणी महिलावर्गाकडून होत आहे. (वार्ताहर )