टाटा सफारी पेटवून देण्याचा प्रयत्न

By Admin | Updated: June 1, 2014 01:26 IST2014-06-01T00:31:48+5:302014-06-01T01:26:18+5:30

सातपूर : किरकोळ वादावरून घरासमोर उभी असलेली टाटा सफारी वाहन पेटवून देण्याचा प्रयत्न करणार्‍या दोघांच्या विरोधात सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Trying to set up a Tata Safari | टाटा सफारी पेटवून देण्याचा प्रयत्न

टाटा सफारी पेटवून देण्याचा प्रयत्न

सातपूर : किरकोळ वादावरून घरासमोर उभी असलेली टाटा सफारी वाहन पेटवून देण्याचा प्रयत्न करणार्‍या दोघांच्या विरोधात सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सातपूर येथील दादोबारोड, गजरा फार्मशेजारी मळे विभागातील जयचंद्र हे श्याम जयराम भंदुरे यांचे निवासस्थान आले. शुक्रवारी रात्री साडेबारा वाजेच्या सुमारास या निवासस्थानासमोरील टाटा सफारी (एमएच १५/डीसी २००६) हे वाहन बाजूला घ्यावे यावरून संशयित रतन घोडके व त्यांचा मुलगा मॉन्टी घोडके आणि श्याम भंदुरे यांच्यात वाद झाला होता. या वादावरून रतन घोडके व मॉन्टी घोडके यांनी टाटा सफारीच्या खाली बारदान टाकले. त्या बारदानावर रॉकेल टाकून पेटवून दिले. यात टाटा सफारीचा मागचा भाग जळाल्याने ४० हजार रुपयांचे नुकसान झाल्याची फिर्याद वाहनधारक श्याम भंदुरे यांनी सातपूर पोलीस ठाण्यात दिली. सातपूर पोलिसांनी दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून, सहायक पोलीस निरीक्षक गायकवाड पुढील तपास करीत आहेत.

Web Title: Trying to set up a Tata Safari

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.