एकच जमीन तिघांना विकण्याचा प्रयत्न

By Admin | Updated: April 22, 2016 23:32 IST2016-04-22T23:32:57+5:302016-04-22T23:32:57+5:30

गुन्हा दाखल : चेहेडी बुद्रूक येथील प्रकार

Trying to sell three land in one place | एकच जमीन तिघांना विकण्याचा प्रयत्न

एकच जमीन तिघांना विकण्याचा प्रयत्न

नाशिकरोड : जमीन खरेदीची इसार पावती करून जमीन खरेदी न करता ती परस्पर तिसऱ्या व्यक्तीस विकण्याचा प्रयत्न करणाऱ्या व मुलीच्या लग्नाकरिता सात लाख रुपये घेऊन फसवणूक केल्याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
श्यामकुमार भगवान पगारे (रा.अशोका मार्ग, गणेशनगर, सिद्धिविनायक सोसायटी) यांनी दिलेल्या फिर्यादित म्हटले आहे की, चेहेडी बुदू्रक हद्दीतील सर्व्हे नं. २७/१२ येथील विभक्त हिश्यातील २३ गुंठे जागा खरेदी करण्यासाठी दिलीप संभाजी पगारे (रा. चेहेडी) यांनी प्रति गुंठा अडीच लाख रुपये अशी रक्कम ठरवून नोटरी रवींद्र ताजणे यांच्या कार्यालयात नोटरी करून घेतली. त्यापोटी १ लाख ५० हजार रुपये चेक व रोखीने दिले. जागा खरेदीसाठी कागदपत्र व खरेदीखताची पूर्तता केली. त्यानंतर मुलीच्या लग्नाच्या अडचणीमुळे श्यामकुमार पगारे यांच्याकडून ७ लाख रुपये घेऊन त्यापोटी दिलेला धनादेश वटला नाही. तसेच इसारपावती केलेली जमीन तिसऱ्या व्यक्तीस विकण्याचा प्रयत्न करून आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जमिनीच्या व्यवहारात फसवणुकीचे प्रकार यापूर्वीही घडल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Trying to sell three land in one place