वडाळा नाका येथे लुटमारीचा प्रयत्न

By Admin | Updated: June 8, 2014 00:06 IST2014-06-07T22:27:57+5:302014-06-08T00:06:37+5:30

पंचवटी येथील गोकुळ दर्शन अपार्टमेंट येथे राहणारे दीपक निकम यांनी भद्रकाली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे़

Trying to raid at Wadala Naka | वडाळा नाका येथे लुटमारीचा प्रयत्न

वडाळा नाका येथे लुटमारीचा प्रयत्न

 

नाशिक : रस्त्याने पायी जात असलेल्या नागरिकाची हातातील अंगठी व मोबाइल हिसकावण्याचा प्रकार गुरुवारी रात्री वडाळा येथे घडला़ हिरावाडी, पंचवटी येथील गोकुळ दर्शन अपार्टमेंट येथे राहणारे दीपक निकम यांनी भद्रकाली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे़ त्यानुसार निकम हे गुरुवारी सायंकाळी सहा वाजता वडाळा नाका येथून पायी जात होते़ त्यांना फोन आल्याने ते थांबले असता पाठीमागून आलेल्या दोन इसमांनी त्यांच्या हातातील मोबाइल व सोन्याची अंगठी हिसकावण्याचा प्रयत्न केला़ या झटापटीत चोरट्यांनी पळ काढला; परंतु या गडबडीत तेरा हजार रुपये किमतीची अंगठी हरवली़ याबाबत दोन अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ (प्रतिनिधी)

Web Title: Trying to raid at Wadala Naka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.