रुग्णांना चांगली आरोग्य सेवा देण्यासाठी प्रयत्न : जगदाळे
By Admin | Updated: October 19, 2015 23:34 IST2015-10-19T23:33:06+5:302015-10-19T23:34:08+5:30
रुग्णांना चांगली आरोग्य सेवा देण्यासाठी प्रयत्न : जगदाळे

रुग्णांना चांगली आरोग्य सेवा देण्यासाठी प्रयत्न : जगदाळे
नाशिक : जिल्हा रुग्णालयात येणाऱ्या रुग्णाला चांगल्या आरोग्यसुविधा, तत्काळ उपचार याबरोबरच वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांसोबत समन्वय साधून वातावरण आरोग्यदायी ठेवण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे नवनियुक्त डॉ. सुरेश परशुराम जगदाळे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले़ प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ़ गजानन होले यांच्याकडून त्यांनी सोमवारी (दि़१९) सकाळी पदभार स्वीकारला़
डॉ़जगदाळे यांची शासनाने शनिवारी (दि़३) आॅक्टोबर रोजी नाशिक जिल्हा रुग्णालयाच्या जिल्हा शल्य चिकित्सकपदी नियुक्ती केली होती. मात्र काही खासगी कारणामुळे त्यांनी पदभार स्वीकारला नव्हता़ रुग्णालयाचा पदभार स्वीकारल्यानंतर जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये चांगला समन्वय साधून कामकाज केले जाणार असल्याचे सांगितले़ राजीव गांधी जीवनदायी योजना व अन्य योजनांचा लाभ रुग्णांना मोठ्या संख्येने देण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत़ तसेच अवैध गोष्टींना लगाम लावण्यासाठी प्रसंगी कठोर भूमिकादेखील घेतली जाणार असल्याचे सुतोवाच त्यांनी यावेळी केले़