पाठलाग करणारे पोलीस वाहनच उडविण्याचा प्रयत्न

By Admin | Updated: May 20, 2016 00:09 IST2016-05-19T23:16:26+5:302016-05-20T00:09:06+5:30

थरार : ८६ टायर, बोलेरो जीप जप्त

Trying to drive the pursuing police vehicles | पाठलाग करणारे पोलीस वाहनच उडविण्याचा प्रयत्न

पाठलाग करणारे पोलीस वाहनच उडविण्याचा प्रयत्न

 नाशिक : म्हसरूळ-मखमलाबाद लिंक रोडवरून संशयास्पदरीत्या जाणाऱ्या जीपचा पाठलाग करत पोलिसांनी आरटीओ कार्यालयाजवळ जीप अडविण्याचा प्रयत्न केला असता सदर जीपचालकाने पोलिसांच्याच जीपला उडविण्याचा प्रयत्न केल्याची घटना पहाटे साडेचार वाजेच्या सुमारास घडली.
म्हसरूळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्तीवर असलेल्या पोलिसांना संशयास्पद जीप आढळल्यानंतर त्यांनी सदर बाब आपल्या वरिष्ठांना कळविली आणि त्यानंतर सुरू झाला संशयास्पद जीपचा पाठलाग. बीट मार्शल राजू लोखंडे, नंदकिशोर जाधव यांनी संशयास्पद बोलेरो जीपचा पाठलाग सुरू केल्यानंतर बिनतारी संदेश यंत्रणेवरून पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्तीवर असणाऱ्या सहायक पोलीस निरीक्षक संजय बेडवाल यांना सदर प्रकार कळविला. त्यानंतर बेडवाल यांनी संशयास्पद बोलेरो जीपचा पाठलाग सुरू केला. बोलेरो जीप आरटीओ कॉर्नरजवळ त्यांना आढळून येताच चौफुलीवर पोलीस वाहनाने ती अडविण्याचा प्रयत्न केला; मात्र बोलेरोचालकाने पोलीस वाहनाला कट दिला अन् बोरगडच्या दिशेने गाडी दामटविली.

Web Title: Trying to drive the pursuing police vehicles

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.