प्रेयसीच्या अंगावर रॉकेल टाकून जाळण्याचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2021 04:18 IST2021-08-12T04:18:47+5:302021-08-12T04:18:47+5:30

या घटनेत प्रेयसी तसेच तिला वाचविण्यासाठी आलेली तिची बहीण व प्रियकर असे तिघे जण भाजले असून, तिघांना उपचारासाठी रुग्णालयात ...

Trying to burn by throwing kerosene on the body of the beloved | प्रेयसीच्या अंगावर रॉकेल टाकून जाळण्याचा प्रयत्न

प्रेयसीच्या अंगावर रॉकेल टाकून जाळण्याचा प्रयत्न

या घटनेत प्रेयसी तसेच तिला वाचविण्यासाठी आलेली तिची बहीण व प्रियकर असे तिघे जण भाजले असून, तिघांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याबाबत पंचवटी पोलीस ठाण्यात जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेत भारती आनंदा गौड ही ८० टक्के तर तिची बहीण सुशीला व संशयित आरोपी सुखदेव गुलाब माचेवाल ऊर्फ कुमावत हे दोघे २० टक्के भाजले आहेत. कुमावतनगरला लागून असलेल्या शिंदेनगर येथील भाविक बेलाजी अपार्टमेंटच्या पाचव्या मजल्यावर ही घटना घडली. महिलेला जिवंत जाळण्याचा गुन्हा केल्यानंतर संशयिताने पलायन केले होते. त्याला पोलिसांनी दिंडोरी रोडवरून ताब्यात घेतले, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक भगत यांनी दिली.

Web Title: Trying to burn by throwing kerosene on the body of the beloved