दोन बॅँकांचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न
By Admin | Updated: June 28, 2016 00:32 IST2016-06-28T00:25:15+5:302016-06-28T00:32:46+5:30
दोन बॅँकांचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न

दोन बॅँकांचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न
नाशिकरोड : जेलरोड नारायण बापूनगर व आशीर्वाद बसथांबा येथील दोन बॅँकांचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न शनिवारी रात्री चोरट्यांनी केल्याचे उघडकीस आले आहे.
आशीर्वाद बसथांबा आयकॉन प्लाझा, गाळा नं. ३ मध्ये स्टेट बॅँक आॅफ बिकानेर अॅण्ड जयपूर या बॅँकेचे एटीएम मशीन शनिवारी रात्री सव्वानऊ ते साडेदहा वाजेच्या सुमारास तोडण्याचा प्रयत्न करण्यात आला. तसेच जेलरोड नारायण बापूनगर येथील स्टेट बॅँकेचे एटीएम मशीनदेखील गॅस कटरच्या साह्याने तोडून चोरी करण्याचा अयशस्वी प्रयत्न करण्यात आला. नागरिकांच्या सतर्कतेमुळे एटीएम केंद्रातील चोरी यशस्वी होऊ शकली नाही. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (प्रतिनिधी)