मनपाच्या संकीर्ण कर विभागात चोरीचा प्रयत्न

By Admin | Updated: March 30, 2017 23:01 IST2017-03-30T23:01:02+5:302017-03-30T23:01:16+5:30

महापालिकेच्या संकीर्ण कर विभागातील महत्त्वाचे दस्तावेज चोरीचा प्रयत्न झाल्याने खळबळ उडाली आहे.

Try to steal in MMC's narrow tax department | मनपाच्या संकीर्ण कर विभागात चोरीचा प्रयत्न

मनपाच्या संकीर्ण कर विभागात चोरीचा प्रयत्न

 अतुल शेवाळे मालेगाव
महापालिकेच्या संकीर्ण कर विभागातील महत्त्वाचे दस्तावेज चोरीचा प्रयत्न झाल्याने खळबळ उडाली आहे. या विभागाचे कुलूप व कपाट तोडून सामान अस्ताव्यस्त करण्यात आले. संबंधित विभागप्रमुखांनी किल्ला पोलिसांना माहिती व तक्रार नोंदविण्यास समर्थन दाखविल्यानंतरही पोलिसांनी काही चोरीला गेले नाही तर गुन्ह्याची नोंद का करता, असा सवाल उपस्थित करीत चोरांनाच पोलीस अप्रत्यक्षरीत्या अभय देत असल्याचा प्रकार घडला आहे.
मालेगाव महापालिकेच्या संकीर्ण विभागात महत्त्वाचे दस्तावेज आहेत. मनपा मालकीचे व्यापारी गाळे भाडेतत्त्वावर दिल्यानंतर करारनामे व इतर कागदपत्रांच्या नोंदी असतात. गेल्या काही दिवसांपासून शहरातील व्यापारी गाळे भाडेतत्त्वावर देण्यावरून वाद सुरू आहेत. काही गाळेमालकांची चौकशीही सुरू आहे.
या पार्श्वभूमीवर बुधवारी रात्री अज्ञात चोरट्यांनी संकीर्ण कर विभागाच्या दरवाजाचे कुलूप तोडून कपाटातील महत्त्वाच्या फाइली चाळून अस्ताव्यस्त केल्याचे उघड झाले आहे. मात्र या विभागाचे प्रमुख तथा सहायक आयुक्त अखलाक अहमद यांनी विषयांचे गांभीर्य ओळखत आठ दिवसांपूर्वी महत्त्वाच्या फाइली सुरक्षित स्थळी ठेवल्या होत्या.
या घटनेची माहिती किल्ला पोलीस ठाण्याला दिल्यानंतर पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ कर्नावळ यांनी घटनास्थळी धाव घेतली. या चोरीच्या प्रकाराबाबत मनपा उपआयुक्त अंबादास गर्कळ यांनी संबंधित विभागप्रमुखांना रीतसर फिर्याद देण्याची सूचना केली होती. तसेच घटनास्थळाच्या पाहणीदरम्यान उपआयुक्त गर्कळ उपस्थित होते. त्यानंतर संकीर्ण कर विभागाचे लिपिक केशव गंगावणे यांनी किल्ला पोलीस ठाण्यात फिर्याद देण्याची तयारीही दाखवली होती. मात्र पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ कर्नावळ यांनी पाहणी केल्यानंतर चोरी झालीच नसल्याचा जावईशोध लावला. मनपाच्या संकीर्ण कर विभागाच्या चोरीचा प्रयत्न होऊनही या प्रकरणी किल्ला पोलीस ठाण्यात गुन्ह्याची
नोंद करण्यात आली नव्हती. (प्रतिनिधी)

Web Title: Try to steal in MMC's narrow tax department

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.