देना बॅँक लुटण्याचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2017 01:02 IST2017-08-23T01:01:55+5:302017-08-23T01:02:00+5:30
येथील देना बँक लुटण्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर गावात घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. घटनास्थळी पोलीस निरीक्षक पाटील यांनी पाहणी करून बँकेच्या बाहेर सीसीटीव्ही कॅमेरे व रात्रीसाठी सुरक्षा रक्षक नेमण्याच्या सूचना केल्या.

देना बॅँक लुटण्याचा प्रयत्न
मुंजवाड : येथील देना बँक लुटण्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर गावात घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. घटनास्थळी पोलीस निरीक्षक पाटील यांनी पाहणी करून बँकेच्या बाहेर सीसीटीव्ही कॅमेरे व रात्रीसाठी सुरक्षा रक्षक नेमण्याच्या सूचना केल्या. येथील जनता विद्यालयासमोर मुख्य रस्त्याला लागून देना बँकेची शाखा आहे. काही दिवसांपूर्वी रात्री १ वाजता घरमालक विश्वनाथ जाधव यांच्या पत्नी रत्नाबाई जाधव यांना घराजवळ काहीतरी आवाज ऐकू आला. घराजवळ गर्दी जमल्यामुळे चोरांनी घाबरून पसार झाले, मात्र बँकेच्या मुख्य तिजोरी रूमच्या भिंतीला अर्धवट भगदाड पडल्याचे उघडकीस आले.
सुरक्षा रक्षक नेमण्याची सूचना
बॅँकेच्या मुख्य तिजोरीला भगदाड पडल्याचे लक्षात येताच बँकेचे सुरक्षा रक्षक रमेश पवार व शिपाई बन्सी सोनवणे यांना कळविण्यात आले. त्यांनी संबंधित घटनेची माहिती सटाणा पोलिसांना दिली.पोलीस निरीक्षक पाटील सहकाºयांना घेऊन घटनास्थळाची पाहणी करून बँक व्यवस्थापक शशांक नियोगी यांनी सीसीटीव्ही कॅमेरे व रात्रीच्या वेळेस सुरक्षा रक्षक नेमण्याच्या सूचना केल्या.