बागलाण एज्युकेशन सोसायटी अध्यक्षपदी विश्वास चंद्रात्रे
By Admin | Updated: September 27, 2016 23:44 IST2016-09-27T23:43:48+5:302016-09-27T23:44:29+5:30
बागलाण एज्युकेशन सोसायटी अध्यक्षपदी विश्वास चंद्रात्रे

बागलाण एज्युकेशन सोसायटी अध्यक्षपदी विश्वास चंद्रात्रे
सटाणा : येथील बागलाण एज्युकेशन सोसायटीच्या संचालक मंडळाची निवड बिनविरोध झाली असून, अध्यक्षपदी विश्वास चंद्रात्रे, तर उपाध्यक्षपदी जिभाऊ खंडू सोनवणे, नितीन चंद्रात्रे यांची निवड करण्यात आली आहे.
सोसायटीचे मावळते अध्यक्ष वर्धमान लुंकड यांनी ज्येष्ठ सभासदांची बैठक घेऊन नूतन संचालक मंडळाच्या नावावर शिक्कामोर्तब केले. त्यांनतर नवनियुक्त संचालक मंडळ जाहीर करण्यात आले. त्यामध्ये अध्यक्ष- विश्वास काशीनाथ चंद्रात्रे, उपाध्यक्ष- जिभाऊ खंडू सोनवणे व अॅड. नितीन चंद्रात्रे, सचिव- अनिल राका, सहसचिव- संजय ब्राह्मणकर, कोशाध्यक्ष- किशोर ततार, तर संचालकपदी के. एस. सोनवणे, विनीत माजगावकर, राजेंद्र भांगडिया, सुभाष भांगडिया, अशोक चोपडा, अशोक निकम, अॅड. महेश देवरे, राजेंद्र अलई यांची नियुक्ती करण्यात आली.
यावेळी मावळते अध्यक्ष वर्धमान लुंकड यांच्या हस्ते नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी शालेय विकास अधिकारी एन. एस. सोनवणे, मुख्याध्यापक एस. जी. निकम, उपमुख्याध्यापक जयश्री गुंजाळ, लेखापाल एम. एच. पठाण आदि उपस्थित होते. (वार्ताहर)