शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

त्र्यंबक च्या नगराध्यक्षांना मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2017 00:54 IST

त्र्यंबकेश्वर येथील भाजपाचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष पुरुषोत्तम लोहगावकर यांच्यावर गुरुवारी सकाळी एका युवकाने हल्ला करून त्यांना मारहाण केल्याची घटना कुशावर्त चौकात घडली. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, हल्लेखोरास ताब्यात घेतले आहे.  लोहगावकर हे मित्रांसमवेत गप्पा मारीत असताना पाठीमागून आलेल्या प्रदीप अडसरे याने हल्ला करून त्यांना मारण्यास सुरुवात केली. 

नाशिक : त्र्यंबकेश्वर येथील भाजपाचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष पुरुषोत्तम लोहगावकर यांच्यावर गुरुवारी सकाळी एका युवकाने हल्ला करून त्यांना मारहाण केल्याची घटना कुशावर्त चौकात घडली. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, हल्लेखोरास ताब्यात घेतले आहे.  लोहगावकर हे मित्रांसमवेत गप्पा मारीत असताना पाठीमागून आलेल्या प्रदीप अडसरे याने हल्ला करून त्यांना मारण्यास सुरुवात केली.   त्र्यंबक च्या नगराध्यक्षांना मारहाण  त्यात त्यांच्या गळ्याला नखे लागून खरचटले आहे. सदर प्रकार घडताच नाशिक येथील भाजपाच्या पदाधिकाºयांनी घटनेची माहिती घेऊन लोहगावकर यांना तत्काळ पोलिसात तक्रार दाखल करण्याचे सूचविले होते. त्यानुसार लोहगावकर यांच्यासह त्र्यंबक शहरातील भाजपा कार्यकर्त्यांनी पोलीस ठाण्यात २धाव घेतली. यावेळी भाजपाचे शहराध्यक्ष शामराव गंगापुत्र, सुरेश गंगापुत्र, तेजस ढेरगे, भाजपा-आरपीआयचे शांताराम बागुल, रवींद्र सोनवणे, समीर पाटणकर, रामायणे आदी उपस्थित होते. अडसरे याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान या प्रकारामुळे लोहगावकर कुटुंबात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. यावेळी लोहगावकर यांनी दाखल केलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, हल्ला करणाºया युवकाशी माझे कोणतेही वैर अथवा संबंध नसतानाही त्याने माझ्यावर हल्ला करण्याची ही दुसरी वेळ आहे. मला मारहाण करतांना कुटुंबातातील महिला, माझे बंधु व मित्र परिवार अडसरे याच्या हातून माझी सुटका करीत असतांना त्याने महिलांना देखील मारहाण केली असून आमच्या जीवास धोका असल्याने आम्हाला पोलीस संरक्षण द्यावे, असेही फिर्यादीत म्हटले आहे.  सदर प्रकरण अजुन चिघळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुरेश चौधरी करीत आहेत. लोहगावकर यांच्या फिर्यादीनंतर त्र्यंबकेश्वर शहर भाजपाचे अध्यक्ष शामराव गंगापुत्र व त्यांचे बंधु सुरेश गंगापुत्र यांनीही पोलीस ठाण्यात एका निवेदनाद्वारे आपल्या जीवाला धोका असल्याने पोलीस संरक्षण देण्याची मागणी केली आहे.   अडसरे याने एक-दीड महिन्यांपूर्वी लोहगावकर यांना अशाच प्रकारची मारहाण केली होती. मात्र त्यावेळी केवळ समज देऊन ते प्रकरण मिटविण्यात आले होते.

टॅग्स :PoliceपोलिसCrimeगुन्हा