निस्वार्थ समाज सेवेतच खरा आनंद- निलीमा पवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2019 17:33 IST2019-01-08T17:33:42+5:302019-01-08T17:33:56+5:30

पिंपळगाव:राष्ट्रविकासात एन एस एस चा स्वयंसेवक विद्यार्थी ही अभिमानाची बाब असुन इन्फोसिस कंपनीच्या अध्यक्ष सुधा मुर्तींचा आदर्श घेण्यासाठी त्यांची पुस्तके वाचली पाहिजे व समाजसेवा, निस्वार्थ सहायता, जबाबदारीची जाणीव, भरपुर वाचन, कष्टाची तयारी या बाबी विद्यार्थी दशेतच रु जायला हव्यात, असे मत मविप्र संस्थेच्या सरचिटणीस निलीमा यांनी रासेयो शिबिराच्या समारोप प्रसंगी मांडले.

True happiness in selfless service - Nilima Pawar | निस्वार्थ समाज सेवेतच खरा आनंद- निलीमा पवार

 रासेयो विशेष श्रमसंस्कार शिबिराचा समारोप प्रसंगी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना निलीमापवार समवेत व्यासपीठावरमााणिकराव बोरस्त,उत्तम बाबा भालेराव, दत्तात्रय पाटिल, प्रल्हाद गडाख, भारती पवार, शिवाजीबस्ते आदी  

ठळक मुद्देधोंडगव्हाण येथे मविप्र समाजाचे खेडगांव महाविद्यालय, वडनेर भैरव महाविद्यालय व कर्म रा स वाघ संस्थेचे राजाराम नगर महाविद्यालय या तिन्हीही महाविद्यालयांच्या संयुक्त विद्यमाने रासेयो विशेष श्रमसंस्कार शिबिराचा समारोप करण्यात आला.

पिंपळगाव:राष्ट्रविकासात एन एस एस चा स्वयंसेवक विद्यार्थी ही अभिमानाची बाब असुन इन्फोसिस कंपनीच्या अध्यक्ष सुधा मुर्तींचा आदर्श घेण्यासाठी त्यांची पुस्तके वाचली पाहिजे व समाजसेवा, निस्वार्थ सहायता, जबाबदारीची जाणीव, भरपुर वाचन, कष्टाची तयारी या बाबी विद्यार्थी दशेतच रु जायला हव्यात, असे मत मविप्र संस्थेच्या सरचिटणीस निलीमा यांनी रासेयो शिबिराच्या समारोप प्रसंगी मांडले.
कार्यक्र माच्या प्रास्ताविकात खेडगांव महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.डी एन कारे यांनी शिबीर काळात केलेल्या कामांचा गौरव केला. वडनेर भैरव महाविद्यालयाचे प्राचार्य ए एल भगत यांनीस्वागत केले. दत्तात्रय पाटील , भारतीपवार,ा्रल्हाद दादा गडाखआदिंनीयावेळीमार्गदर्शनकेले.
रासेयो विशेष श्रमसंस्कार शिबिराच्या काळात स्वयंसेवक विद्यार्थ्यांनी दगड-माती बंधारे, एका ऐतिहासिक बावडीचे पुनरु ज्जीवन, झाडांना रंग, स्वछता, रक्तदान व हीमोग्लोबिन तपासणी शिबीर, ग्राम सर्वेक्षण, रस्ते दुरूस्ती, जनजागृती, व्याख्याने अशी कामे केली. या श्रमदानाची दखल घेऊन ग्रामस्थांकडुन प्रत्येक स्वयंसेवक विद्यार्थ्यास सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. याप्रसंगी सरपंच अनीता कडाळे, उपसरपंच अंबादास पुरकर,खंडेराव बस्ते, काळुबा थेटे, बबनराुरकर, रत्नाताई पुरकर, आदी उपस्थित होते.
कार्यक्र माच्या यशस्वीतेसाठी रासेयो कार्यक्र म अधिकारी विकास शिंदे , ज्ञानेश्वर भगुरे, प्रदीप नवले, विठ्ठल जाधव, बी पी गायकवाड, अविनाश सोनवणे, अनिता डेर्ले, मिलिंद धेबडे, नंदु गवळी यांनी परिश्रम घेतले. रासेयो शिबिराचा अहवाल प्रा विकास शिंदे, सूत्रसंचालन पंकज गांगुर्डे तर आभार प्रदर्शन प्रा. प्रदीप नवले यांनी केले.

Web Title: True happiness in selfless service - Nilima Pawar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.