ट्रक अर्धा पुलावर, अर्धा रेल्वेरुळावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2021 04:15 IST2021-09-11T04:15:48+5:302021-09-11T04:15:48+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क इगतपुरी : येथील मुंबई-आग्रा महामार्गावरील इगतपुरीच्या बोरटेंभे येथील रेल्वे पुलावर गुरुवारी (दि. ९) मध्यरात्री २ वाजता ...

Trucks half on bridges, half on railroad tracks | ट्रक अर्धा पुलावर, अर्धा रेल्वेरुळावर

ट्रक अर्धा पुलावर, अर्धा रेल्वेरुळावर

लोकमत न्यूज नेटवर्क

इगतपुरी : येथील

मुंबई-आग्रा महामार्गावरील इगतपुरीच्या बोरटेंभे येथील रेल्वे पुलावर गुरुवारी (दि. ९) मध्यरात्री २ वाजता ट्रकला अपघात झाला. या अपघातामुळे ट्रकचा काही भाग रेल्वे पुलाला अधांतरी लटकला होता. त्यामुळे रेल्वेची वाहतूक तीन तास विस्कळीत झाली होती.

गुरुवारी मध्यरात्रीनंतर हा अपघात घडला. मुंबई-आग्रा महामार्गावर मुंबईच्या दिशेने जाणारा ट्रक (क्रमांक एमपी ०९ जीएच १६५८) मध्यरात्री २ वाजता बोरटेंभे पुलावर अपघातग्रस्त झाला. चालकाचा वाहनावरील ताबा सुटला की रस्त्यावरील खड्ड्यांनी अपघाताला निमंत्रण दिले, याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत. रेल्वे पुलाचा संरक्षक भिंतीचा कठडा तुटून रेल्वे ट्रॅकवर तसेच ट्रकचा एक टायरही निखळून पडला. या अपघातात

पुलावरून ट्रक रेल्वे रुळावर पडला असता तर मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता होती. सुदैवाने या अपघातात जीवितहानी झाली नाही. या अपघातामुळे रेल्वेची वाहतूक मात्र तीन तास विस्कळीत झाली होती. या अपघाताची माहिती समजताच रेल्वेचे दुर्घटना राहत दल, आरपीएफ, लोहमार्ग पोलीस घटनास्थळी दाखल झाले. तीन तासांच्या अथक प्रयत्नांनी ट्रकला बाजूला करण्यात यश आले. त्यानंतर मध्य रेल्वेची वाहतूक सुरळीत झाली.

फोटो- १० बोरटेंभे ॲक्सिडेंट

बाेरटेंभे येथे रेल्वे पुलावर अपघातग्रस्त ट्रक

100921\10nsk_24_10092021_13.jpg

फोटो- १० बोरटेंभे ॲक्सीडेंटबाेरटेंभे येथे रेल्वे पुलावर अपघातग्रस्त ट्रक 

Web Title: Trucks half on bridges, half on railroad tracks