शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
3
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
4
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
5
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
6
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
7
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
8
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
9
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
10
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
11
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
12
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
13
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
14
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
15
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
16
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
17
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
18
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव
19
मराठी पाट्यांचे रडगाणे; ९८ टक्के आस्थापनांनी न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले
20
दगडफेकीपर्यंतचा प्रचार कोणत्या दिशेने जाणार?

मुथूट दरोड्यात वापरण्यात आलेला ट्रक ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 02, 2019 1:16 AM

मागील महिन्यात शुक्रवारी (दि.१४) सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास सोने लूट करणाऱ्या टोळीतील सराईत गुन्हेगारांनी उंटवाडी येथील मुथूट फायनान्सच्या कार्यालयावर दरोडा टाकला,

नाशिक : मागील महिन्यात शुक्रवारी (दि.१४) सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास सोने लूट करणाऱ्या टोळीतील सराईत गुन्हेगारांनी उंटवाडी येथील मुथूट फायनान्सच्या कार्यालयावर दरोडा टाकला, मात्र त्यांना या दरोड्यात कुठल्याही प्रकारे लूट करता आली नाही. धाडसी साजू सॅम्यूअलच्या प्रतिकाराला कंटाळून दरोडेखोरांनी त्याच्यावर गोळ्या झाडून पळ काढला. दरोड्यातील लूट केलेला ऐवज वाहून नेण्यासाठी शिमला मिरचीच्या पोत्यांनी भरलेला आयशर ट्रक (जीजे ०५, बीयू ८६५१) पेठरोडवर शहराच्या वेशीजवळ उभा केलेला होता. याच आयशरमधून चोरट्यांनी आशेवाडी येथे दुचाकी सोडून सुरतकडे पलायन केल्याचे तपासात समोर आले आहे. पोलिसांच्या पथकाने सुरतमधून गुन्ह्यात वापरलेला आयशर अखेर ताब्यात घेतला आहे.मुथूट दरोड्याच्या गुन्ह्यात पोलिसांनी टोळीचा मुख्य सूत्रधार जितेंद्रसिंग विनयबहाद्दूरसिंग राजपूत व शार्पशूटर परमेंदर सिंग या दोघांना बेड्या ठोकल्या आहेत. त्यांचे उर्वरित आठ ते दहा साथीदार अद्याप फरार आहेत. परमेंदर सिंग याला ताब्यात घेतल्यानंतर या गुन्ह्यात वापरलेले पिस्तूल तसेच आयशर टेम्पो पोलिसांच्या हाती लागला आहे. तत्पूर्वी घटनेच्या दुसºयाच दिवशी आशेवाडी रामशेज किल्ल्याच्या पायथ्याशी दरोडेखोरांच्या तीन पल्सर दुचाकी पोलिसांना आढळून आल्या होत्या. या दुचाकींवरूनच दरोडेखोरांपर्यंत पोलिसांच्या पथकाला पोहचता आले.सराईत जितेंद्रसिंगची कबुलीबिहार राज्यातील एका कारागृहातून दरोड्याचा कट शिजविण्यात आला होता. त्यातील सर्व आरोपी बिहार, उत्तर प्रदेशमधील आहेत. या दरोड्यातील टोळीमधील परमेंदरसिंग हा सोने लुटीमधील कुख्यात गुंड सुबोधसिंगचा हस्तक असून, तुरुंगातून सुबोधसिंग हा या टोळीला सूचना करत असल्याचेही तपासात पुढे आले आहे. गुन्ह्याचा म्होरक्या जितेंद्रसिंग राजपूत याने पोलीस कोठडीत लुटीचा ऐवज वाहतूक करण्यासाठी स्वमालकीच्या टेम्पोतून पलायन केल्याची कबुली दिली़

टॅग्स :RobberyदरोडाPoliceपोलिस