ट्रक चोरट्यास अटक
By Admin | Updated: December 12, 2015 00:28 IST2015-12-12T00:27:40+5:302015-12-12T00:28:31+5:30
ट्रक चोरट्यास अटक

ट्रक चोरट्यास अटक
नाशिक : मालधक्का परिसरातून सीमेंटच्या गोण्यांसह भरलेला ट्रक चोरणारा संशयित आकाश रामचंद्र चिकने (वय २२, रा. रमाबाई आंबेडकरनगर, गुलाबवाडी, देवळाली गाव) यास गुन्हे शाखेच्या युनिट एकने अटक केली आहे़
नाशिकरोडच्या जगताप मळा परिसरात राहणारे सचिन ओमप्रकाश सोमाणी यांचा ट्रक (एमएच १५ ईजी १७५१) मंगळवारी (दि.८) पहाटेच्या सुमारास चोरीस गेला होता. या ट्रकमध्ये अंबुजा कंपनीच्या सीमेंट गोण्या होत्या. सोमाणी यांच्या फिर्यादीवरून नाशिकरोड पोलिसांनी ट्रक व सीमेंटच्या गोण्या असा एकूण २४ लाख ६८ हजार रु पये किमतीचा मुद्देमाल चोरून नेल्याचा गुन्हा दाखल केला होता़ या प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेच्या युनिट एकचे पोलीस निरीक्षक सदानंद इनामदार, सहायक पोलीस निरीक्षक डी. व्ही. गिरमे यांनी करून संशयित आकाश चिकने यास अटक केली़