ट्रक- दुचाकी अपघातात मनपा कर्मचारी ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2017 22:10 IST2017-09-14T22:09:58+5:302017-09-14T22:10:04+5:30
भरधाव वेगाने आयशर ट्रक चालवून जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना बुधवारी (दि.१३) मध्यरात्रीच्या सुमारास सातपूर औद्योगिक वसाहतीत घडली. मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे नाव गणेश देव्हाड असे आहे.

ट्रक- दुचाकी अपघातात मनपा कर्मचारी ठार
सातपूर : भरधाव वेगाने आयशर ट्रक चालवून जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना बुधवारी (दि.१३) मध्यरात्रीच्या सुमारास सातपूर औद्योगिक वसाहतीत घडली. मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे नाव गणेश देव्हाड असे आहे.
याप्रकरणी सातपूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रात्रीच्या सुमारास मनपाच्या सातपूर येथील तरण तलावावर फिल्टर आॅपरेटर म्हणून काम करणारे गणेश सुरेश देव्हाड (३७, रा. धर्माजी कॉलनी) हे हीरो होंडा दुचाकीने (एमएच १५, सीई ७४६८) शहराकडे येत होते. यावेळी समोरून भरधाव जाणाºया आयशर ट्रक (एमएच १४, बीजे २५१६) चालकाने रस्त्याच्या परिस्थितीचा अंदाज न घेता दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेत देव्हाड हे गंभीर जखमी झाले. त्यांना औषधोपचारासाठी रु ग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मयत घोषित केले. सदरचा अपघात सातपूर औद्योगिक वसाहतीतील आनंद आय पॉवर कंपनी समोर घडला. याबाबत मयत गणेशचे भाऊ योगेश देव्हाड यांनी सातपूर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार पोलिसांनी ट्रकचालक मुंजा पंढरीनाथ काळे यास अशोकनगरमधून अटक केली आहे. पुढील तपास पोलीस हवालदार बी. एस. हरिश्चंद्र करीत आहेत.