पालिका म्हसरूळ उपकार्यालयाला ट्रकची धडक
By Admin | Updated: June 25, 2014 00:10 IST2014-06-24T23:56:53+5:302014-06-25T00:10:08+5:30
पालिका म्हसरूळ उपकार्यालयाला ट्रकची धडक

पालिका म्हसरूळ उपकार्यालयाला ट्रकची धडक
नाशिक : गुजरातहून टाईल्स घेऊन येणाऱ्या भरधाव ट्रकने मंगळवारी सकाळी म्हसरूळ महापालिकेच्या उपकार्यालयाला जोरदार धडक दिली़ यामध्ये एक दुचाकी व महापालिकेच्या उपकार्यालयाचे नुकसान झाले़ या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली असून, ट्रकचालक सलमान शेख याला अटक करण्यात आली आहे़
मंगळवारी सकाळी सात वाजेच्या सुमारास गुजरातहून टाईल्स व प्लॅस्टिक जाळ्या घेऊन जय शंकर गुड्स टान्सपोर्ट कंपनीचा ट्रक (एमएच१७, ए जी ३२३३) दिंडोरी रोडने येत होता़ म्हसरूळ गावाजवळ रस्त्याचे काम सुरू असल्याने तसेच वरवंडीरोड वळणावर ट्रकचालकाला अंदाज न आल्याने वरवंडी येथील दीपक नानासाहेब जाधव यांच्या दुचाकीला (क्रमांक एमएच१५, सीए१६३४) धडक देऊन महापालिकेच्या उपकार्यालयाला जाऊन धडकला़ या धडकेमुळे शेजारील डीपीवर दोन मोठे स्फ ोट होऊन प्रचंड आवाज झाला़
यानंतर परिसरात वीजपुरवठा खंडित झाला होता़ या घटनेची माहिती मिळताच विद्युत विभागाचे वाय़डी़ सोनवणे हे कर्मचाऱ्यांसह पोहोचले व वीजपुरवठा सुरळीत केला़ दरम्यान, अपघाताच्या ठिकाणी सकाळी दूधवाल्यांची मोठी गर्दी असते; मात्र रस्त्याचे काम सुरू असल्याने त्यांनी जागा बदलली आहे़ रस्त्याचे काम सुरू नसते तर याठिकाणी मोठी जीवितहानी झाली असती, अशी चर्चा नागरिकांमध्ये होती़ याप्रकरणी दीपक नानासाहेब जाधव यांनी पंचवटी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून ट्रकचालकाला अटक करण्यात आली आहे़ (प्रतिनिधी)