शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

ट्रकची दुचाकीला धडक. महिला जागीच ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2021 00:57 IST

वणी : भरधाव वेगातील १२ टायर ट्रकने पुढे जाणाऱ्या दुचाकीला धडक दिल्याने ५० वर्षीय महिला जागीच ठार झाली, तर दोघे गंभीर जखमी झाले आहेत. अपघातानंतर फरार झालेल्या ट्रकचालकाला पाठलाग करुन पकडण्यात यश आले.

ठळक मुद्दे वणी ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करण्यात आले.

वणी : भरधाव वेगातील १२ टायर ट्रकने पुढे जाणाऱ्या दुचाकीला धडक दिल्याने ५० वर्षीय महिला जागीच ठार झाली, तर दोघे गंभीर जखमी झाले आहेत. अपघातानंतर फरार झालेल्या ट्रकचालकाला पाठलाग करुन पकडण्यात यश आले.

याबाबत माहिती अशी गुरुवारी (दि.२५) दुपारच्या सुमारास वणी ग्राम सचिवालयालगत असलेल्या कला व वाणिज्य महाविद्यालयाच्या रस्त्यावरून दिलीप काशीनाथ पाडवी (६०) राहणार शिवलपाडा भनवड, जिजाबाई दिलीप पाडवी (५०) व विठ्ठल तुळशीराम गायकवाड (७०) राहणार अंबाड (भनवड) असे तिघे दुचाकीवरून वणी सापुतारा रस्त्यावरुन दुपारच्या सुमारास जात असताना भरधाव वेगात आलेल्या १२ टायर ट्रकने दुचाकीला मागून धडक दिल्याने दुचाकीवरील महिला काही फुटावर पडून जबर मार लागल्याने जिजाबाई पाडवी या जागीच ठार झाल्या, तर दिलीप पाडवी व विठ्ठल गायकवाड हे गंभीर जखमी झाले.

त्यांच्यावर वणी ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करण्यात आले. प्रकृती अस्वस्थ झाल्याने त्यांना नाशिकला हलविण्यात आले. दरम्यान अपघातानंतर भरधाव ट्रकचालक पसार झाला. त्याचा पोलिसांनी पाठलाग केला. माळे फाट्याजवळ हा ट्रक पकडण्यात आला. पोलिसांनी ट्रकसह चालकास ताब्यात घेतले.

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यू