इगतपुरी : येथील नवीन कसारा घाटात कापसाने भरलेल्या चालत्या ट्रकला अचानक आग लागून जळून खाक झाला. सुदैवाने यात कुठलीही जीवितहानी झाली नाही.नवीन कसारा घाटात मुंबईच्या दिशेने कापूस भरलेला ट्रक(क्र .एमएच १८ बीजे २७७९) घाट उतरत असताना ब्रेक फेल पॉर्इंटजवळ गाडीमध्ये शॉर्टसर्किट होऊन अचानक पेट घेतला. ही बाब चालकाच्या लक्षात आल्यावर त्याने ट्रक रस्त्याच्या कडेला उभा केला. आगीने काही वेळातच रौद्र रुप धारण केले यात ट्रक खाक झाला. आगीची माहिती पीक इन्फ्रा कंपनीचे पेट्रोलिंग करणारे कर्मचारी विजय कुंडगर, जुरेश जाधव, प्रदीप मुर्तडक, समाधान चौधरी, नवनाथ गुजाल यांना मिळताच अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले. त्यानंतर आगीवर नियंत्रण मिळवत यश आले.
कापसाने भरलेला ट्रक जळून खाक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2019 01:23 IST