देवळा : विंचूर-प्रकाशा महामार्गावरील माळवाडी फाट्यावर वाळूने भरलेला ट्रक उलटल्याची घटना घडली. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही.मंगळवारी (दि.३) रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास ही घटना घडली. देवळा शहरापासून दीड किलोमीटर अंतरावर हा अपघात घडला. सटाण्याहून वाळूने भरलेला हायवा ट्रक (क्र. एमएच १५ जीव्ही ८०८८) देवळ्याकडे येत होता. माळवाडी फाट्यावरील पुलाजवळ चालकाचा ताबा सुटल्यामुळे हा ट्रक रस्त्यालगत असलेल्या भुईमुगाच्या शेतात उलटला. त्यामुळे शेतात सर्वत्र वाळू पसरली. रात्रीच्या अंधारात ट्रकमधील काही वाळू परिसरातील ट्रॅक्टरचालकांनी वाहून गेल्याची माहिती प्रत्यक्षदर्शनी दिली. बुधवारी (दि.४) संबंधित ट्रकमालकाने ट्रकमधील वाळू काढून ट्रक अपघात स्थळावरून क्र ेनच्या मदतीने अन्यत्र हलविली. घटनेबाबत देवळा पोलीस ठाण्यात कोणतीही नोंद नसल्याची माहिती पोलिसांनी दिली.
वाळूने भरलेला ट्रक उलटला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2020 22:51 IST
देवळा : विंचूर-प्रकाशा महामार्गावरील माळवाडी फाट्यावर वाळूने भरलेला ट्रक उलटल्याची घटना घडली. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही.
वाळूने भरलेला ट्रक उलटला
ठळक मुद्देट्रक रस्त्यालगत असलेल्या भुईमुगाच्या शेतात उलटला.