ट्रक २५ फूट खड्ड्यात कोसळला

By Admin | Updated: May 15, 2015 23:51 IST2015-05-15T23:42:05+5:302015-05-15T23:51:42+5:30

हरसूलचे तीन ठार : आठंबेनजीकची घटना; पाच गंभीर

The truck collapsed in a 25-feet pavement | ट्रक २५ फूट खड्ड्यात कोसळला

ट्रक २५ फूट खड्ड्यात कोसळला


 कळवण : नांदुरी रस्त्यावरील आठंबे गावानजीक घाटातील वळणावर बालभारती नाशिक येथून शालेय पुस्तके घेऊन कळवणकडे निघालेल्या आयशर ट्रकचालकाचा ताबा सुटल्याने ट्रक २५ फूट खड्ड्यात कोसळून उलटल्याने तीन जणांचा मृत्यू, तर पाच गंभीर जखमी झाले. जखमींना उपचारासाठी नाशिक येथे हलविण्यात आले आहे.
नाशिक येथून बालभारतीमधून शुक्रवारी सकाळी ११ वाजता कळवण येथील पंचायत समितीत पाठ्यपुस्तके घेऊन येणारा आयशर ट्रक (क्र. एमएच १५ सीके-५९४०) आठंबेपासून एक किमी अंतरावरील घाटातील शेवटच्या धोकादायक वळणावरून चालकाचा ताबा सुटल्याने २५ फूट वळणावरील खड्ड्यात जाऊन उलटला.  ह्या ट्रक मध्ये असलेले आठ जण ट्रक व पुस्तके यांच्याखाली दाबले गेले. घटनास्थळी धाव घेऊन रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनातील लोकांच्या मदतीने ट्रक सरळ करून दाबल्या गेलेल्या व्यक्तींना बाहेर काढले मात्र ह्या घटनाक्र मात रोहिदास चिमणा हिलीम (२० ), धाकलु सीताराम पानगे (२०) रा. सर्व गोलदरी हरसुल, जि. नाशिक हे दोघे जागीच ठार झाले तर नाशिक येथे औषधोपचार दरम्यान संतोष यशवंत कामडी (२०) यांचा मृत्यु झाला. राजाराम शंकर कामडी (१७ ), तुषार सुरेश कामडी (२० ), भागिरथ गोपाळ गहवाळ (१७ ), गोकुळ विष्णू धोंडगे (२५ ) मनोहर गंगाराम कामडी (१८) सर्व रा. गोलदरी ता. हरसूल हे जखमी झाले. पुढील तपास कळवणचे पोलीस निरीक्षक मधुकर गावित यांच्या मार्गदर्शनाखाली कळवण पोलीस करीत आहे

Web Title: The truck collapsed in a 25-feet pavement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.