मखमलाबादला टवाळखोरांचा उपद्रव

By Admin | Updated: October 18, 2015 22:21 IST2015-10-18T22:20:57+5:302015-10-18T22:21:51+5:30

मखमलाबादला टवाळखोरांचा उपद्रव

Troubles in Makhmalabad | मखमलाबादला टवाळखोरांचा उपद्रव

मखमलाबादला टवाळखोरांचा उपद्रव

पंचवटी : मखमलाबाद गावातील बसस्थानक परिसरातील सहारानगर भागात टवाळखोरांचा उपद्रव वाढल्याने रहिवासी त्रस्त झाले असून याबाबत पंचवटी पोलिसांना निवेदन देण्यात आले आहे.
सहारानगर भागात मोकळे भूखंड असून, याठिकाणी अनेक गुन्हेगारी टोळक्यातील सदस्यांचा, मद्यपींचा तसेच जुगारींचा वावर असून, दैनंदिन सकाळपासून हे टोळके या मोकळ्या पटांगणात फिरत असतात. या टोळक्यातील काही जण खुलेआम मद्य प्राशन करून परिसरात अशांतता पसरविण्याचे काम करीत असून याबाबत स्थानिक नागरिकांनी समजावून सांगण्याचा प्रयत्न केला तर ते त्यांनाच दमदाटी, शिवीगाळ करत असल्याने शेकडो नागरिक त्रस्त झाले आहेत. पोलिसांनी सहारानगर भागात पोलीस गस्त वाढवून गावगुंड व टवाळखोरांच्या मुसक्या आवळाव्यात यासाठी परिसरातील नागरिकांनी पंचवटी पोलिसांना निवेदन दिले आहे.

Web Title: Troubles in Makhmalabad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.