करंडक काव्यवाचन स्पर्धेचा निकाल जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:43 IST2021-01-08T04:43:08+5:302021-01-08T04:43:08+5:30

स्पर्धेत १७ महाविद्यालयातील संघांमधून ३४ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. स्पर्धेत मालेगावच्या महाराजा सयाजीराव गायकवाड महाविद्यालयाने काव्य करंडक पटकावला, तर पुण्याच्या ...

Trophy Poetry Competition Results Announced | करंडक काव्यवाचन स्पर्धेचा निकाल जाहीर

करंडक काव्यवाचन स्पर्धेचा निकाल जाहीर

स्पर्धेत १७ महाविद्यालयातील संघांमधून ३४ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. स्पर्धेत मालेगावच्या महाराजा सयाजीराव गायकवाड महाविद्यालयाने काव्य करंडक पटकावला, तर पुण्याच्या निशांत देशपांडेने पहिले, मालेगावच्या गायकवाड महाविद्यालयाच्या गौतम जगतपाने दुसरे, तर नाशिकच्या सुशील उशिरे याने तिसरे पारितोषिक मिळवले. स्पर्धेचे हे २३ वे वर्ष होते. गोखले एज्युकेशन सोसायटीचे सचिव डॉ. मो. स. गोसावी यांच्या हस्ते पारितोषिक वितरण झाले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून विभागीय सचिव प्राचार्य डॉ. राम कुलकर्णी, प्राचार्य डॉ. संजय तुपे, डॉ. विजया धनेश्वर, प्रा. भीमराज पगारे, सुधाकर बोरसे, प्रा वृषाली उगले, डॉ. प्रतिभा जाधव, अलका कुलकर्णी, प्रा. आर. बी. बागुल उपस्थित होते.

प्राचार्य तुपे यांनी प्रास्ताविकेतून स्पर्धेची माहिती दिली.

Web Title: Trophy Poetry Competition Results Announced