त्र्यंबकला थंडीचा कडाका वाढला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2019 00:27 IST2019-12-15T23:44:03+5:302019-12-16T00:27:55+5:30
त्र्यंबकेश्वर येथे थंडीचा कडाका वाढला असून, थंडीपासून बचाव करण्यासाठी आबालवृद्ध शेकोट्यांचा आसरा घेत आहेत

त्र्यंबकला थंडीचा कडाका वाढला
त्र्यंबकेश्वर : येथे थंडीचा कडाका वाढला असून, थंडीपासून बचाव करण्यासाठी आबालवृद्ध शेकोट्यांचा आसरा घेत आहेत. साधारणपणे कार्तिक संपत आला की थोडीफार थंडी पडायला सुरु वात होते. त्यानंतर मार्गशीर्ष, पौष, माघ व हुताशनी (होळी) पौर्णिमेपर्यंत थोड्याफार प्रमाणात थंडी असते, मात्र यंदा कडाका वाढल्याने चौकाचौकात शेकोट्या पेटलेल्या दिसून येत आहे. त्र्यंबकेश्वर तीर्थक्षेत्री येणारे भाविकदेखील उबदार कपडे परिधान करून आलेले दिसून येत आहेत. तर थंडी असल्याने सकाळी जॉगिंग, व्यायाम, प्राणायाम करणाऱ्यांची संख्याही वाढलेली दिसून येत आहे. तर जव्हार, नाशिक, पेगलवाडी, श्रीस्वामी समर्थ रोड, अहिल्या धरण परिसरात पर्यटकांची गर्दी दिसून येत आहे.