त्र्यंबककरांना संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज यात्रेचे वेध !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2020 01:38 PM2020-01-03T13:38:36+5:302020-01-03T13:38:53+5:30

त्र्यंबकेश्वर : पौष वद्य एकादशी अर्थात (२० जानेवारी) रोजी संतश्रेष्ठ श्री निवृत्तीनाथ महाराजांच्या यात्रेचे रहिवाशांसह वारकऱ्यांना वेध लागले आहेत.  ...

Trimbakkar seeks the pilgrimage of Sant Nivritnath Maharaj Yatra! | त्र्यंबककरांना संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज यात्रेचे वेध !

त्र्यंबककरांना संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज यात्रेचे वेध !

googlenewsNext

त्र्यंबकेश्वर : पौष वद्य एकादशी अर्थात (२० जानेवारी) रोजी संतश्रेष्ठ श्री निवृत्तीनाथ महाराजांच्या यात्रेचे रहिवाशांसह वारकऱ्यांना वेध लागले आहेत. नाशिकचे जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांच्या दालनात श्रीनिवृत्तीनाथ महाराज यात्रा नियोजन बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. तर साधारण पुढील आठवड्यात प्रांताधिकारी यांची यात्रा नियोजन बैठक होईल. त्यानंतर पोलीस बंदोबस्त नियोजन बैठक व शेवटी यात्रा चार पाच दिवसांवर आल्यानंतर नगरपरिषदेची नियोजन बैठक होत असते. यात्रेसाठी आवश्यक साहित्य जंतुनाशके फनेल टीसीएल पावडर आलम बीएचसी पावडर आदी खरेदीची मंजुरी घेण्या करिता विशेष सभा बोलाविण्यात येणार आहे.
दरम्यान निवृत्तीनाथ यात्रेच्या पाशर््वभूमीवर ज्या लोकांचे नेहमीचे व्यवसाय नाहीत असे लोकही फक्त यात्रा कालाविधतले तीन दिवस व नेहमीच्या व्यावसायिकांनी यात्रेत विक्र ी करावयाचा प्रसादी वाण आणण्यास तयारी
प्रारंभ केला आहे. यात प्रसाद विक्र ी हॉटेल व्यवसायासाठी लागणारा माल तसेच यात्रा जेथे भरते त्या रस्त्यावर ठिकठिकाणी बहुतेक घरमालक आपल्या घरापुढील जागेत टेंपररी व्यवसाय करतात. काही घरमालक व्यवसाय न करता जागा भाड्याने देणे पसंत करतात.अशा व्यावसायिकांनी जय्यत तयारी करणे सुरु केले आहे. विजेचे पाळणे चक्री मिकी माउस जंपिंग स्लाईड आदी मुलांचे खेळ शहरात लवकर दाखल होतात व यात्रा संपल्यानंतरही उशीराने शहर सोडतात. पालिकेनेही निवृत्तीनाथ यात्रेसाठी लागणारे जंतुनाशके आरोग्य विभागाचे साहित्य यात्रेत लावण्यासाठी तात्पुरत्या नळपोस्टसाठी आवश्यक साहित्य पथदीपांसाठी लागणारे विद्युत साहित्य आदींची खरेदी करण्यासाठी पालिका लवकरच निविदा प्रसिध्दी करतील अशी शक्यता आहे. होलसेल प्रसादी साहित्य विक्र ीची दुकाने गजबजली आहेत.
संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज यात्रे साठी आळंदी सासवड मुक्ताईनगर सोलापुर आदी महाराष्ट्रातून दुरवरु न विविध ठिकाणच्या पायी दिंड्या आता त्र्यंबकेश्वरची वाट तुडवत जीवघेण्या थंडीत दुपारच्या उन्हाची पर्वा न करता निवृत्तीरायांना भेटण्यासाठी नाम संकीर्तन करीत श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वरची वाट जवळ करीत पाउले चालती निवृत्तीची वाट ! या उक्तीप्रमाणे येत असतात.

Web Title: Trimbakkar seeks the pilgrimage of Sant Nivritnath Maharaj Yatra!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक