त्र्यंबकेश्वरला ‘नगराध्यक्ष आपल्या दारी’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2018 18:26 IST2018-12-16T18:26:23+5:302018-12-16T18:26:46+5:30
त्र्यंबकेश्वर : शहरात नगरपालिकेतर्फे रविवारपासून ‘नगराध्यक्ष आपल्या दारी’ उपक्रम राबविण्यात येत असल्याची माहिती प्रभारी नगराध्यक्ष स्वप्निल शेलार यांनी दिली. या माध्यमातून नागरिकांच्या समस्या, तक्र ारी ऐकून त्याचे त्वरित निराकरण करण्यात येणार आहे. पालिकेविषयी नागरिकांच्या काय अपेक्षा आहेत यासाठी हा उपक्रम राबविण्यात येत आहे.

त्र्यंबकेश्वरला ‘नगराध्यक्ष आपल्या दारी’
त्र्यंबकेश्वर : शहरात नगरपालिकेतर्फे रविवारपासून ‘नगराध्यक्ष आपल्या दारी’ उपक्रम राबविण्यात येत असल्याची माहिती प्रभारी नगराध्यक्ष स्वप्निल शेलार यांनी दिली. या माध्यमातून नागरिकांच्या समस्या, तक्र ारी ऐकून त्याचे त्वरित निराकरण करण्यात येणार आहे. पालिकेविषयी नागरिकांच्या काय अपेक्षा आहेत यासाठी हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
शेलार यांनी सर्व कामगार, कार्यालयीन कर्मचारी, सफाई ठेकेदार, पाणीपुरवठा ठेकेदार, नगरसेवक आदींची संयुक्त बैठक बोलावून त्यांच्याही समस्या जाणून घेतल्या. कामगारांसाठी विमा पॉलिसी सुरू करण्यात आली असून, कामगारांनी प्रामाणिकपणे कामे करावीत, अशा सूचना शेलार यांनी यावेळी दिल्या.
नगरसेवकांच्या सहकार्यातून शहरातील अपंगांना दरमहा पाच हजार रुपये मानधन सुरू करण्यात आले आहे. मागील फरक पंचवीस ते तीस हजार रु पये धनादेशाच्या स्वरुपात अदा करण्यात आले. आर्थिक दुर्बल घटकातील गरीब व होतकरू दोन गुणवंत विद्यार्थ्यांना पालिका दत्तक घेणार असून, त्यांचा पदवीपर्यंत शिक्षणाचा खर्च पालिका उचलणार आहे. यावर्षी दोन मुलांना दत्तक घेण्यात आले आहे. अपंगांना हक्काचे घर मिळावे या हेतूने लवकरच इमारत साकारण्यात येणार आहे, अशी माहिती देण्यात आली. याशिवाय सर्वच कामगार व कर्मचाऱ्यांना दिवाळीत सानुग्रह अनुदान देऊन त्यांच्या आनंदात पालिका सामील झाली. सुशिक्षित बेरोजगारांसाठी, विस्थापित टपरीधारकांना पालिकेतर्फे गाळे देण्यात येणार आहे. पालिकेने अभिलेख संगणकीकरण मशीन खरेदी करून पालिकेचा संगणकीकरण अभिलेख कक्ष साकारला आहे, अशी माहिती प्रभारी नगरसेवक शेलार यांनी दिली.