त्र्यंबकेश्वर तालुका हगणदारीमुक्त !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2017 00:06 IST2017-11-14T23:55:43+5:302017-11-15T00:06:02+5:30
शिरपेचात मानाचा तुरा : ६८६७ शौचालये पूर्ण त्र्यंबकेश्वर : तालुकासाठी स्वच्छ भारत अभियानांतर्गत ६८३७ शौचालयांचे उद्दिष्ट देण्यात आले होते. ते पूर्ण झाल्याने तालुक्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. त्यामुळे शासनाकडून आता विविध प्रकल्पांसाठी निधी मिळण्याचा मार्गही मोकळा झाला आहे.

त्र्यंबकेश्वर तालुका हगणदारीमुक्त !
शिरपेचात मानाचा तुरा : ६८६७ शौचालये पूर्ण
त्र्यंबकेश्वर : तालुकासाठी स्वच्छ भारत अभियानांतर्गत ६८३७ शौचालयांचे उद्दिष्ट देण्यात आले होते. ते पूर्ण झाल्याने तालुक्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. त्यामुळे शासनाकडून आता विविध प्रकल्पांसाठी निधी मिळण्याचा मार्गही मोकळा झाला आहे.
गेल्या वर्षापासून लोकप्रतिनिधी, प्रशासन, पदाधिकाºयांनी केलेल्या परिश्रमाला यश आले आहे. स्वच्छ भारत अभियानांतर्गत तालुक्यात ६८३७ शौचालयांचे उद्दिष्ट देण्यात आले होते. त्यानुसार या आर्थिक वर्षात तालुक्यातील ग्रामीण भागातील लोक शौचालय बांधून त्याचा वापर करत असल्याने तालुका आता पूर्णपणे हगणदारीमुक्त झाल्याची घोषणा आज पंचायत समिती सभापती ज्योती राऊत यांनी पत्रकार परिषदेत केली. यावेळी सभापती ज्योती राऊत, उपसभापती रवींद्र भोये, गटविकास अधिकारी मधुकर मुरकुटे, माजी सभापती देवराम भस्मा, मधुकर झोले आदी उपस्थित होते.
उपसभापती रवींद्र भोये यांनी, तालुका हगणदारीमुक्त झाला आहे. यासाठी प्रशासनासह गावकºयांनी चांगले सहकार्य केले. यात प्रामुख्याने गटविकास अधिकारी मधुकर मुरकुटे यांचा मोलाचा सहभाग आहे. तसेच तालुका हगणदारीमुक्त करण्यासाठी ग्रामसेवक, अंगणवाडी कर्मचारी, तलाठी, शिक्षक आदींसह लोकप्रतिनिधी सामाजिक कार्यकर्ते तसेच ग्रामपंचायत पदाधकारी आदींच्या सहकार्यामुळेच ८४ ग्रामपंचायतींच्या कार्यक्षेत्रातील कुटुंब हगणदारीमुक्त होऊ शकली.
यापुढेही तालुका हगणदारीमुक्त ठेवण्यासाठी सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहन गटविकास अधिकाºयांनी केले. तालुक्यात प्रबोधन, जनजागृती, वैयक्तिक व सार्वजनिक शौचालय उभारणीला चालना तसेच उघ्यावर शौचास बसण्यास बंदी करण्यात आली
आहे. स्वच्छतेमध्ये तालुक्याचा प्रथम क्र मांक आलाा असून, तो कायम राहावा असा आमचा प्रयत्न राहणार आहे. गावाने निर्मलग्राम होण्यासाठी ग्रामपंचायतींना मोठे अधिकार असून, गावात सरपंच, सदस्यांनी विकासाची वाट धरावी. तालुका हगणदारीमुक्त
जाहीर झाला असला तरी येथून पुढे तालुक्यातील प्रत्येक नागरिकाने जबाबदारीने स्वच्छता पाळावी व स्वच्छतेमध्ये गावाचा प्रथम क्रमांक
कायम ठेवावा.
- मधुकर मुरकुटे, गटविकास अधिकारी.