त्र्यंबकेश्वर तालुक्यात ६५ टक्के मतदान
By Admin | Updated: February 22, 2017 01:55 IST2017-02-22T01:55:10+5:302017-02-22T01:55:28+5:30
त्र्यंबकेश्वर तालुक्यात ६५ टक्के मतदान

त्र्यंबकेश्वर तालुक्यात ६५ टक्के मतदान
त्र्यंबकेश्वर : तालुक्यातील जि.प.चे तीन व पंचायत समितीच्या सहा गट-गणांसाठी आज सकाळी ७.३० वाजेपासून सायंकाळी ५.३० पर्यंत ११५ बूथवर अत्यंत शांततेच्या वातावरणात मतदान प्रक्रिया पार पडली. तालुक्यात एकूण ९६०८४ मतदार ्सून ५०१२९ पुरुष मतदार व ४५९५५ स्त्री मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार होत्या. सकाळी मतदानाचा वेग कमी होता. त्यानंतर मतदानाचा वेग वाढला होता. सकाळ नंतर अनेक ठिकाणी मतदान उत्साहात पार पडले.वृद्ध, दिव्यांग तसेच नव मतदार यांचा उत्साह दिसून आला. तळेगाव, काचुर्ली, सापगाव, शिरसगाव, धुमोडी, आंबोली, पिंपळद, वेळुंजे, तळवाडे, अंजनेरी आदि गावांना महिलांचा उत्साह दिसून आला. तर वृद्ध-मध्यमवर्यान आदि लोक मतदान करीत होते. सापगाव येथील तीन नव मतदार व शिरसगाव येथील कु. मथुरा संजय दिवे, किरण दिनकर मोंढे यांना मतदारांचे कुतुहल होते. त्र्यंबक तहसिल कार्यालयात निवडणुक निर्णय अधिकारी सुरेखा चव्हाण, तहसिलदार महेंद्र पवार, निवडणुक प्रमुख निवासी नायब तहसिलदार मोहन कनोजे, नायब तहसिलदार (निवडणुक) राजेंद्र कांबळे, नायब तहसिलदार (प्रशासन) सुरेश निरगुडे आदि तळ ठोकून कार्यालयात होते.
दरम्यान गटाचे १४ व गणांचे ६ उमेदवारांचे भवितव्य आज मतदान यंत्रात बंद झाले आहे. किरकोळ वाद वगळता मतदान शांततेत पार पडले. साडे अकरा बारा नंतर मतदानाचे टक्के हळूहळू वाढू लागले. चारही राजकीय पक्षांचे कार्यकर्ते आपापल्या उमेदवारांसाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करीत होते. नोटाबंदीचा फटका ग्रामीण भागात काहीसा बसला. निसर्ग राजाने त्र्यंबक तालुक्यावर कृपा केल्याने बळीराजा आनंदात दिसत होता. पो.नि. सुधाकर मांडवकर, पो.उ.नि. सुरेश चौधरी, पो.उ.नि. किरण मेहेर, कैलास आकुले यांनी जादा कुमकेसह पोलीस बंदोबस्त कडक लावला होता. त्यामुळे कुठेही वातावरण चिघळले नव्हते.