प्रसाद योजनेत त्र्यंबकेश्वरचा समावेश
By Admin | Updated: August 25, 2016 00:59 IST2016-08-25T00:59:20+5:302016-08-25T00:59:32+5:30
प्रसाद योजनेत त्र्यंबकेश्वरचा समावेश

प्रसाद योजनेत त्र्यंबकेश्वरचा समावेश
नाशिक : केंद्र सरकारच्या धार्मिक स्थळांचा विकास करण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या प्रसाद योजनेत देशभरातील आठ धार्मिक स्थळांची निवड करण्यात आली असून, त्यात नाशिकच्या त्र्यंबकेश्वर तीर्थस्थळाचा समावेश करण्यात आल्याची माहिती खासदार हेमंत गोडसे यांनी दिली.
त्र्यंबकेश्वर हे देशातील १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक ज्योतिर्लिंग म्हणून ओळखले जाते. येथे दर बारा वर्षांनी सिंहस्थ कुंभमेळा भरतो. इतकेच नव्हे तर येथे नारायण नागबलीचा विधी करण्यासाठी देशभरातून भाविक येतात. गेल्या वर्षभरापासून खासदार हेमंत गोडसे हे त्र्यंबकेश्वर व अंजनेरीचा विकास व्हावा, यासाठी प्रयत्न करीत होते. त्र्यंबकेश्वर हे देशाच्या तीर्थविकास क्षेत्रात यावे, यासाठी केंद्रीय सांस्कृतिक व पर्यटन मंत्री महेश शर्मा यांची खासदार गोडसे यांनी भेट घेतली होती. १६ आॅगस्ट २०१६ च्या केंद्रीय पर्यटन विभागाने घेतलेल्या निर्णयात महाराष्ट्रातून त्र्यंबकेश्वरसह इतर सात राज्यांतील धार्मिक स्थळांची केंद्राच्या प्रसाद
योजनेमध्ये निवड केली आहे. प्रसाद योजनेंतर्गत रस्ते विकास, सार्वजनिक शौचालय, हॉटेल, निवासी व्यवस्था, नॅचरल ड्रिल, रोपवे, निसर्गातील धबधबे, कथडे बांधणे, हेलिपॅड बाधणे, हॉस्पिटल बांधणे, नदीचे झरे विकसित करणे, मोबाइल कनेक्टव्हिटी व वायफाय सुविधा, पार्किंग व्यवस्था, स्थानिक वस्तूंचे प्रदर्शन व अन्य विकासकामे करता येतात. त्र्यंबकेश्वरसह अन्य सात निवड झालेल्या धार्मिक स्थळांमध्ये सोरटी सोमनाथ (गुजरात), हजरथबल (जम्मू-काश्मीर), उज्जैन (मध्य प्रदेश), अयोध्या (उत्तर प्रदेश), बेलपूर (पश्चिम बंगाल) आदिंसह अन्य दोन ठिकाणांचा समावेश आहे. (प्रतिनिधी)