त्र्यंबकेश्वर येथे इंद्रदेव महाराज यांचा पदवीदान सोहळा उत्साहात

By Admin | Updated: September 5, 2015 00:25 IST2015-09-05T00:24:38+5:302015-09-05T00:25:18+5:30

त्र्यंबकेश्वर येथे इंद्रदेव महाराज यांचा पदवीदान सोहळा उत्साहात

At the Trimbakeshwar, in honor of the meditation ceremony of Indra Dev Maharaj | त्र्यंबकेश्वर येथे इंद्रदेव महाराज यांचा पदवीदान सोहळा उत्साहात

त्र्यंबकेश्वर येथे इंद्रदेव महाराज यांचा पदवीदान सोहळा उत्साहात

त्र्यंबकेश्वर : स्वामी इंद्रदेवजी महाराज यांचा पदवीदान सोहळा त्र्यंबकेश्वर येथील रेणुका हॉल येथे उत्साहात संपन्न झाला. श्री आनंद आखाड्यातर्फे त्यांना हा सन्मान देण्यात आला.
श्री इंद्रदेवजी महाराज यांचे आनंद आखाड्याच्या वतीने श्री श्री १००८ श्री विद्यावाचस्पती धर्मसम्राट पदवीदान आणि तसेच श्री मंहत स्वामी इंद्रदेवेश्वरानंद महाराज असे नामाभिदान करण्यात आले आहे. श्री इंद्रदेव महाराज मथुरा निवासी असून, प्रसिद्ध भागवत कथाकार आहेत. त्यांचा नाशिक येथे पदवीदान समारंभ होणार होता; परंतु पुन्हा एकदा शैव -वैष्णव वाद निर्माण होण्याची शक्यता झाली. शेवटी सर्व तयारी करून देखील नाशिक येथील कार्यक्र म रद्द झाला. इंद्रदेव महाराज यांचे हजारो भक्त आहेत. कथेच्या माध्यमातून त्यांचा भक्त परिवार मोठा आहे. आनंद आखाड्याचे स्वामी सागरानंद सरस्वती यांचादेखील शिष्य आणि भक्त परिवार देशातभरात विस्तारलेला आहे.
सर्वांच्या इच्छेखातर त्र्यंबक येथे दुपारी कार्यक्रम संपन्न झाला. आखाडा परिषदेचे अध्यक्ष आणि निरंजनी आखाड्याचे श्रीमहंत नरेंद्रगिरी महाराज आणि आनंद आखाड्याचे स्वामी सागरानंद सरस्वती महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पदवीदान सोहळा संपन्न झाला.
याप्रसंगी स्वामी शंकरानंद सरस्वती महाराज, गणेशानंद महाराज, साध्वी शिवाणी दुर्गा, रवींद्रपुरी महाराज, डॉ. बिंदूजी महाराज आदिंसह आनंद आणि निरंजनी या दोन्ही आखाड्यांचे रमता पंच सर्व शैव आखाड्यांचे प्रतिनिधी व हजारो भक्त उपस्थित होते.
माधव महाराज राठी यांनी सूत्रसंचालन, तर समीर पाटणकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी पौरोहित्य केले. येथील स्वामी सागरानंद सरस्वती गुरुकुलातील विद्यार्थ्यांनी भजन भक्तिगितांनी सर्वांना मोहून टाकले. (वार्ताहर)

Web Title: At the Trimbakeshwar, in honor of the meditation ceremony of Indra Dev Maharaj

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.