शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
4
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
5
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
6
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
7
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
8
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
9
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
10
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
11
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
12
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
13
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
14
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
15
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
16
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
17
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
18
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
19
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
20
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

त्र्यंबकेश्वरला ‘अ’ वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा; नगरविकास विभागाने जारी केला शासन निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2025 12:48 IST

या निर्णयामुळे श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वरच्या विकासाला चालना मिळणार आहे

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: नाशिकमध्ये सन २०२७ मध्ये भरणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर देवस्थानला ‘अ’ वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा देण्यात आला आहे. या निर्णयामुळे श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वरच्या विकासाला चालना मिळणार आहे. नगरविकास विभागाने गुरुवारी या संदर्भातील शासन निर्णय जारी केला.

श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर हे  देशातील १२ ज्योतिर्लिंगापैकी एक जागृत देवस्थान असून,  दक्षिण भारतातील अत्यंत पवित्र स्थळांपैकी  एक आहे. दर १२ वर्षांनी होणारा  सिंहस्थ कुंभमेळा, गंगा गोदावरी उत्सव, संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज यात्रा, श्रावण महिना प्रदक्षिणा यासारख्या अनेक धार्मिक कार्यक्रमांमुळे भाविक मोठ्या प्रमाणात त्र्यंबकेश्वरला येत असतात. या पार्श्वभूमीवर त्रिंबक नगर परिषद क्षेत्रात पायाभूत सुविधा आणि इतर विकासकामांसाठी त्रिंबक नगर परिषदेला ‘अ’ वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा देण्याचा ठराव नगरपरिषदेने मंजूर केला होता.नाशिक विभागीय आयुक्तांनी राज्य सरकारला प्रस्ताव सादर केला होता. नगरविकास विभागाच्या प्रधान सचिवांच्या अध्यक्षतेखालील समितीने  निर्णय घेत राज्य सरकारला  श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वरला ‘अ’  तीर्थक्षेत्राचा दर्जा देण्याची शिफारस केली होती. 

टॅग्स :trimbakeshwarत्र्यंबकेश्वरKumbh Melaकुंभ मेळा