शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्या' ५ जागांबाबत राजनाथ सिंह आणि शरद पवारांमध्ये फोनवरून चर्चा; प्रकाश आंबेडकरांचा दावा
2
पवार वि. पवार वादाला मतदार कंटाळला; बारामतीत टक्का घसरला
3
आजचे राशीभविष्य - ८ मे २०२४; धन - मान - सन्मान मिळतील, सरकार कडून फायदा होईल
4
ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजप सरकार कोसळणार? हरयाणामध्ये तीन अपक्ष आमदारांनी काढला पाठिंबा
5
तीन ईव्हीएम जाळण्याचा प्रयत्न; तरुणावर गुन्हा दाखल; सोलापूर जिल्ह्यातील बागलवाडी येथील बूथवरील प्रकार
6
‘सेक्स स्कँडल’च्या २५,००० पेन ड्राइव्हचे पोलिसांनीच वाटप केले; कुमारस्वामी यांचा आरोप, मोदीही प्रथमच बोलले
7
अरविंद केजरीवाल यांना जामीन देण्यास सुप्रीम कोर्ट अनुकूल; पण...
8
'तुला सहानंतर कोण आहे? बारामतीचा कोण येत नाही'; आमदार दत्ता भरणेंची शरद पवार गटाच्या कार्यकर्त्याला शिवीगाळ
9
मतदानाच्या दिवशी बारामतीत नात्यांचा ट्विस्ट, सुप्रिया सुळेंनी घेतली अजित पवारांच्या आईची भेट; तर अजित पवार म्हणाले... मेरी माँ मेरे साथ है!
10
‘मुस्लीम आरक्षण’ नवा मुद्दा; प्रचारात होतोय वारंवार उल्लेख, मोदींच्या जाळ्यात विरोधक अडकले
11
१० लाख इनाम असलेल्या बासित दारसह ४ अतिरेकी चकमकीत ठार
12
४ जून ‘इंडिया आघाडी’ची एक्स्पायरी डेट : पंतप्रधान मोदी 
13
घराण्याचा वारसा जिंकणार की नव्या चेहऱ्याला कौल मिळणार? विखे-लंके लढत : महसूलमंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला
14
‘बंगाली प्राइड’वर अन् विकास-अराजकतेमध्ये संघर्ष; दक्षिण बंगालच्या जागांवर तृणमूलची मदार
15
डाॅक्टरांच्या मनाईनंतरही धोनी खेळतोय आयपीएल; याच्या मांसपेशी फाटल्या
16
दिल्लीच्या प्ले ऑफच्या आशा कायम; राजस्थानचा २० धावांनी पराभव; संजू सॅमसनची अपयशी झुंज
17
बीअर शॉपीच्या परवान्यासाठी लाच; उत्पादन शुल्क अधीक्षकासह तीन अधिकारी जाळ्यात
18
‘मॅट’ने केले राज्य सरकारचे पोस्टमार्टेम; वैद्यकीय शिक्षण संचालकांची नियुक्ती तत्काळ संपुष्टात आणण्याचे आदेश; नवीन संचालक नेमा
19
उपनगरांतील मतदार दिलदार, शहरात कंजुषी; मुंबईतील सर्व मतदारसंघांचे आकडे काय सांगतात...
20
दौडा दौडा... भागा भागा सा... प्रचार करताना दमछाक

त्र्यंबकेश्वरला देवस्थान ट्रस्टतर्फे गुरुपासून वार्षिक रथोत्सव यात्रा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2018 7:17 PM

त्र्यंबकेश्वर : श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टतर्फे सालाबाद प्रमाणे व पुर्वापार चालत आलेल्या परंपरेनुसार या वर्षीदेखील कार्तिक पौर्णिमा तथा वैकुंठ चतुर्दशी अर्थात त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त वार्षिक रथोत्सव सोहळा बुधवारपासून सुरु होत आहे. हा सोहळा दोन दिवस संपन्न होत असुन मुख्य सोहळा गुरु वारी (दि.२२) रोजी संपन्न होईल.

ठळक मुद्देदोन दिवशीय धार्मिक सोहळ्याची तयारी पुर्ण

त्र्यंबकेश्वर : श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टतर्फे सालाबाद प्रमाणे व पुर्वापार चालत आलेल्या परंपरेनुसार या वर्षीदेखील कार्तिक पौर्णिमा तथा वैकुंठ चतुर्दशी अर्थात त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त वार्षिक रथोत्सव सोहळा बुधवारपासून सुरु होत आहे. हा सोहळा दोन दिवस संपन्न होत असुन मुख्य सोहळा गुरु वारी (दि.२२) रोजी संपन्न होईल.ज्योर्तिलिंग त्र्यंबकेश्वर मंदीराचा रथोत्सव सोहळा त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टतर्फे दरवर्षी पारंपारीक पध्दतीने साजरा केला जातो. यानिमित्ताने विविध कार्यक्र मांचे आयोजन करण्यात आले आहे. बुधवारी वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी ज्या सरदार रघुनाथ विंचूरकर यांनी ज्योर्तिलिंग भगवान त्र्यंबकराजाला २२ फुट उंचीचा शिसवी लाकडापासुन तयार केलेला भव्य कोरीव नक्षीकामाची कलाकुसर केलेला रथ बहाल केला आहे. सरदार रघुनाथराव विंचुरकर घराण्याच्या वतीने त्यांचे पुरोहित विलास अग्निहोत्री देवस्थान ट्रस्टतर्फे बुधवारी (दि.२१) दुपारी १.३० ते ४ पर्यंत तसेच रात्री १० ते उत्तररात्री १ वाजेपर्यंत वैकुंठीची विशेष महापुजा पालखी सोहळा व हरिहर भेट सोहळा संपन्न होणारईल.हा सोहळा अवर्णनीय असतो.त्याचप्रमाणे गुरु वारी (दि.२२) रोजी दुपारी ३.३० वा. प्रत्यक्ष रथोत्सवास सुरु वात होणार असुन भगवान त्र्यंबक राजाची रथातुन सवाद्य पालखी मिरवणुक मेनरोडने निघेल. कुशावर्तावर स्नानादि महापुजा होईल. साधारणत: ६ वाजता सायंकाळी रथयात्रा मंदीराकडे परतीकडे मार्गक्र मण करेल. मधल्या वेळेत रथापुढे आकर्षक शोभेच्या दारुची आतषबाजी व विद्युत रोषणाई देवस्थान ट्रस्टतर्फे केली जाते. हा सोहळा पाहण्यासाठी हजारो भाविक, यात्रेकरु हजेरी लावतात. रात्री ८ वाजता दीपमाळेची पुजा होऊन रात्री दीपमाळ लावतात. त्यानंतर पुनश्च शोभेच्या दारुची आतषबाजी करण्यात येते.संपुर्ण गावात उत्साह ओसंडून वाहत असतो. गावात सुखशांती समृद्धी यावी, गावात कुठलीही रोगराई येऊ नये पाऊस,पाणी चांगला पडावा यासाठी याच दिवशी सकाळी ११.३० वा. ग्रामदेवता महादेवीला गाडाभर भातबळी दिला जातो. बळीची ही प्रथा पारंपारीक पध्दतीने चालत आलेली आहे.