शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप-संघातील घटक नाराज; म्हणे, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरचा युद्धविराम ही तर चूक, शत्रुत्व थांबले
2
शूरवीरांचा देश आहे, असा संदेश पाकला देणे आवश्यक होते; RSSचे सुनील अंबेकर यांचे प्रतिपादन
3
कर्नल सोफियांवर टीका भोवली, मंत्री विजय शाहवर FIR; हायकोर्टाने फटकारले, रात्री गुन्हा दाखल
4
न्या. भूषण गवई देशाचे ५२वे सरन्यायाधीश; अनेक महत्त्वपूर्ण निर्णय देणाऱ्या पीठांमध्ये सहभाग
5
अनामिक भीती वाटते, अस्थिर मन शांत होत नाही? कळकळीने स्वामींना हाक मारा, ‘ही’ प्रार्थना कराच
6
ब्रह्मोस अण्वस्त्रांच्या डेपोवर आदळले असते तर काय झाले असते? किती मोठा स्फोट झाला असता?
7
महिला राफेल उडवू शकतात, तर लष्करात त्यांची संख्या मर्यादित का? सुप्रीम कोर्टाचा सरकारला सवाल
8
गरिबांच्या सेवेमुळे माझ्या मुलाला हे पद मिळाले; सरन्यायाधीश गवई यांच्या मातोश्री भावुक
9
२१ दिवसांत ३१ माओवादी यमसदनी; छत्तीसगड-तेलंगणा सीमेवर कारवाईला मोठे यश
10
पाकने २१ दिवसांनी BSF जवानाला भारताच्या ताब्यात दिले; वडील म्हणाले, मुलाची गळाभेट घ्यायची आहे
11
डोनाल्ड ट्रम्प यांचा पाचव्यांदा दावा; म्हणाले, “होय, भारत-पाकमधील युद्ध अमेरिकेनेच संपविले”
12
२०२७ पासून मेट्रोचा मार्ग वेगाने विस्तारेल: मुख्यमंत्री; काशीगाव-दहिसरदरम्यान तांत्रिक चाचणी
13
शरद पवार गटाच्या बैठकीत स्थानिक निवडणुकांवर चर्चा; नेमके काय घडले, कोणता निर्णय झाला?
14
‘लाडक्या बहिणी’च्या नावे खाती उघडून सायबर भामट्यांना ३० हजारांत विक्री; तिघे अटकेत
15
पावसाळी शेडसाठी जैन मंदिर हायकोर्टात; ट्रस्टला महापालिकेकडे निवेदन देण्याचे निर्देश
16
‘सोडूनी सारी लाज, क्यूआर कोडने घेतली लाच’; दोन पोलिस अन् एका खबऱ्याला अटक, नेमके प्रकरण काय?
17
नागरी संरक्षण दलाच्या मानधन प्रस्तावास वित्त विभागाचा अडसर; काही त्रुटी काढून घातला खोडा
18
जम्मू काश्मीरमध्ये सैन्याच्या गणवेशात दिसले काही संशयित; महिलेची पोलिसांत धाव, शोधमोहीम सुरू
19
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली
20
तुर्कस्तानचा पाकला पाठिंबा, JNUचा मोठा निर्णय; तुर्की विद्यापीठाबरोबचा करार केला रद्द

त्र्यंबकनाका ते अशोकस्तंभ एकेरी वाहतूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2018 22:53 IST

नाशिक : स्मार्ट सिटी अंतर्गत अशोकस्तंभ ते त्र्यंबक नाका हा स्मार्ट रोड करण्यात येत असून, प्रथम अशोकस्तंभ ते त्र्यंबकनाकापर्यंतच्या मार्गाच्या कामास सुरुवात करण्यात आली आहे़ या मार्गाच्या अर्ध्या भागातून दुहेरी वाहतूक सुरू करण्यात आली असून, या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते़ त्यामुळे या रस्त्याचे काम होईपर्यंत त्र्यंबकनाका सिग्नल बाजूकडून अशोकस्तंभाकडे जाणाऱ्या मार्गावर सर्व प्रकारच्या वाहनांसाठी एकेरी वाहतुक सुरु करण्यात येत आहे़

ठळक मुद्देसर्व प्रकारच्या वाहनांसाठी एकेरी वाहतुक‘ईद ए मिलाद’ मिरवणुकीमुळे नाशिकरोडच्या वाहतूक मार्गात बदल

नाशिक : स्मार्ट सिटी अंतर्गत अशोकस्तंभ ते त्र्यंबक नाका हा स्मार्ट रोड करण्यात येत असून, प्रथम अशोकस्तंभ ते त्र्यंबकनाकापर्यंतच्या मार्गाच्या कामास सुरुवात करण्यात आली आहे़ या मार्गाच्या अर्ध्या भागातून दुहेरी वाहतूक सुरू करण्यात आली असून, या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते़ त्यामुळे या रस्त्याचे काम होईपर्यंत त्र्यंबकनाका सिग्नल बाजूकडून अशोकस्तंभाकडे जाणाऱ्या मार्गावर सर्व प्रकारच्या वाहनांसाठी एकेरी वाहतुक सुरु करण्यात येत आहे़ सर्व प्रकारच्या वाहनांसाठी तातीडने ही एकेरी वाहतूक सुरू करण्यात येणार आहे़ त्यामुळे वाहनधारकांना त्र्यंबकनाक्यापासून अशांकस्तंभाकडे येता येणार असले तरी अशोकस्तंभाकडून त्र्यंबकनाक्याकडे मात्र जाता येणार नसल्याचे पोलीस उपआयुक्त लक्ष्मीकांत पाटील यांनी काढलेल्या अधिसूचनेत म्हटले आहे़वाहनधारकांसाठी पर्यायी मार्ग* स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत स्मार्ट रोडवर पायलट प्रोजेक्ट म्हणून अशोकस्तंभ ते त्र्यंबकनाका या मार्गाचे नूतनीकरण होणार असल्याने पंचवटीकडून येणाºया सर्व प्रकारच्या वाहनांना सीबीएसकडे जायचे असल्यास त्यांनी रविवार कारंजा - सांगली बँक सिग्नल - शालिमार - शिवाजीरोड - सीबीएस असे मार्गस्थ होतील़ तसेच त्र्यंबकनाका - सातपूरकडे जावयाचे असल्यास शालिमार-खडकाळी सिग्नल-जिल्हा परिषदमार्गे त्र्यंबकनाका मार्गस्थ होतील़* गंगापूररोडकडून- रामवाडी पुलाकडून येणाºया सर्व प्रकारच्या वाहनांना मेहेर सिग्नल-सीबीएस-त्र्यंबकनाकाकडे जायचे असल्यास त्यांनी१़ अशोकस्तंभ - रविवार कारंजा - सांगली बँक सिग्नल - मेहेर सिग्नल़२़ अशोकस्तंभ - रविवार कारंजा - सांगली बँक सिग्नल-शालिमार-शिवाजीरोड-सीबीएस़३़अशोकस्तंभ-रविवार कारंजा-सांगली बँक सिग्नल - शालिमार- खडकाळी सिग्नल - जिल्हा परिषद-त्र्यंबकनाका-सातपूर असे मार्गस्थ व्हावे किंवा गंगापूर नाका-कॅनडा कॉर्नर-टिळकवाडीमार्गे सीबीएस असे मार्गस्थ व्हावे़* मुंबई नाक्याकडून पंचवटीकडे जाणाºया वाहनांनी मुंबईनाका - वडाळानाका-द्वारका-आडगाव नाका-काट्या मारुती - निर्माणी या मार्गाचा अवलंब करावा़* सिडको व सातपूरकडून पंचवटीकडे जाणाºया वाहनांनी मायको सर्कल - जुना सीटीबी सिग्नल - एचडीएफसी सर्कल - कॅनडा कॉर्नर - जुना गंगापूर नाका - रामवाडी किंवा ड्रिम कॅसलमार्गे पंचवटीकडे मार्गस्थ व्हावे़* स्मार्ट रोडचे काम सुरू असल्याने त्र्यंबकनाका ते अशोकस्तंभ व त्र्यंबकनाका ते किटकॅट कॉर्नर परिसरात नो हॉल्टिंग, नो पार्किंग झोन कार्यरत करण्यात आले आहेत़ या अधिसूचनेची तातडीने अंमलबजावणी केली जाणार आहे़ या अधिसूचनेचे उल्लंघन करणाºया वाहनधारकांवर मोटार वाहन कायद्यान्वये कारवाई केली जाणार आहे़

‘ईद ए मिलाद’ मिरवणुकीमुळे नाशिकरोडच्या वाहतूक मार्गात बदलनाशिक : दरवर्षीप्रमाणे ‘ईद ए मिलाद’निमित्ताने नाशिकरोड परिसरातून बुधवारी (दि़२१) मिरवणूक काढण्यात येणार आहे़ या मिरवणुकी मार्गावरील मंडप उभारले जात असल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होत असल्याने याठिकाणच्या वाहतूक मार्गात बदल करण्यात येणार असल्याची अधिसूचना पोलीस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील यांनी प्रसिद्ध केली आहे़नाशिकरोड येथील ईद ए मिलादच्या दिवशी काढण्यात येणारी मिरवणूक ही नाशिकरोड-गोसावीवाडी-सुभाष रोड- डॉ़ आंबेडकर पुतळा-शिवाजी पुतळा-बिटको चौक- महात्मा गांधी रोडने सत्कार पॉर्इंट-देवळालीगाव चौकीसमोरून विहितगाव व तेथून फिरून पुन्हा देवळाली गाव गांधी पुतळा-साने गुरुजी रोडने गाडेमळा मळा- देवळालीगाव यामार्गे काढली जाते़ त्यामुळे सकाळी ७ ते दुपारी ४ या कालावधित मिरवणूक मार्ग सर्व प्रकारच्या वाहनांसाठी पूर्णपणे बंद असणार आहे़या मार्गावरून जाणा-या व येणा-या वाहनांनी १) अनुराधा चौक ते आर्टिलरी सेंटर ते रोकडोबावाडी पुलावरून विहितगाव बागुलनगर या मार्गाचा अवलंब करावा़ २) सिन्नर बाजूकडून येणारी वाहतूक ही सिन्नरफाटा उड्डाणपुलावरून दत्तमंदिर सिग्नल चौक येथून इतरत्र जातील व नाशिककडून सिन्नरकडे जाणारी वाहतूक ही दत्तमंदिर येथून उड्डाणपुलाचा वापर करतील़ ३)देवळाल कॅम्पकडून नाशिकरोडकड जाणारी वाहतूक ही बागुलनगर विहितगाव रोकडोबावाडी पूल आर्टिलरी सेंटरने दत्तमंदिरला येऊन इतरत्र जातील़

टॅग्स :NashikनाशिकSmart Cityस्मार्ट सिटी