त्र्यंबक नगराध्यक्षांनी स्वीकारला पदभार
By Admin | Updated: January 3, 2016 00:09 IST2016-01-03T00:06:17+5:302016-01-03T00:09:28+5:30
त्र्यंबक नगराध्यक्षांनी स्वीकारला पदभार

त्र्यंबक नगराध्यक्षांनी स्वीकारला पदभार
त्र्यंबकेश्वर : त्र्यंबक नगरपालिकेच्या नवनिर्वाचित नगराध्यक्ष विजया लढ्ढा यांनी पदाचा कार्यभार स्वीकारला आहे. यावेळी समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी स्वामी सागरानंद सरस्वती होते. प्रमख पाहुणे म्हणून ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक तथा माजी नगराध्यक्ष यादवराव तुंगार होते.
यावेळी सुरेश गंगापुत्र, अॅड. श्रीकांत गायधनी, प्रशांत गायधनी, युवराज कोठुळे, संतोष कदम, शांताराम बागुल, सुनील अडसरे आदि उपस्थित होते. धनंजय तुंगार यांनी प्रास्ताविक केले. समारंभात संतोष कदम यांनी होत असलेल्या बंडखोरीचा व शिवसेनेला मदत न केल्याच्या आरोपाचे खंडन केले. मी बंडखोरी केलेली नाही. राज्यात शिवसेना-भाजपा युती आहे. त्यानुसार भाजपाला मदत केली.