त्र्यंबकेश्वर : शहरातील सांडपाणी प्रक्रिया केंद्रात जमा करण्याच्या कामावर असलेल्या पोकलेन मशीनचा धक्का लागून बालक ठार झाले आहे. पाचआळीतील रिंगरोड परिसरातून पोकलेन चालला असताना तेथील मैदानावर खेळत असलेली मुले आली. दुपारी साडेतीन वाजेदरम्यान पोकलेनचा धक्का लागून अखिल योगेश गमे वय (११) हा पोकलेनच्या चाकाखाली आल्याने त्याचा मृत्यू झाला. अपघातानंतर पोकलेन चालक फरार झाला. यासंदर्भात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल झाला नव्हता.
पोकलेनचा धक्का लागून त्र्यंबकला बालक ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2022 01:51 IST