त्र्यंबकला पहिल्याच सोमवारी पन्नास हजार भाविकांची गर्दीत्

By Admin | Updated: July 29, 2014 00:56 IST2014-07-29T00:09:13+5:302014-07-29T00:56:24+5:30

त्र्यंबकला पहिल्याच सोमवारी पन्नास हजार भाविकांची गर्दीत्

Trimbak on the first Monday, crowd of fifty thousand devotees | त्र्यंबकला पहिल्याच सोमवारी पन्नास हजार भाविकांची गर्दीत्

त्र्यंबकला पहिल्याच सोमवारी पन्नास हजार भाविकांची गर्दीत्

र्यंबकेश्वर : श्रावण महिन्यातील पहिल्या सोमवारी त्र्यंबकला साधारणत: पन्नास हजारांवर भाविकांनी गर्दी केली होती.
लगोलग दोन दिवस आणि रमजान ईदची उद्याची सुटी पाहता येथे येणाऱ्या भाविकांची संख्या विभागून गेली. चौथ्या शनिवारी शासकीय सुटी त्यात शनि अमावास्या, फेरीला जाणारी मंडळी एक दिवस अगोदरच येतात. त्यामुळे असणाऱ्या सुट्यांचा आनंद घेण्यासाठी झालेली गर्दी आणि पहिलाच श्रावणी सोमवार असल्याने मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली होती.
त्र्यंबकला विशेष करून तिसऱ्या सोमवारचे आकर्षण असते. त्यावेळेस मात्र ४ ते ५ लाख भाविक येतात. परिक्रमेसाठी जाणाऱ्या भाविकांनी नेहमीप्रमाणे चिखलातून जाण्याचा आनंद मात्र सिमेंटच्या रस्त्यामुळे घेता आला नसला तरी काटे कुटे, चिखलामुळे होणारी उचलटाक मात्र कमी झाली आहे. नदी-नाल्याच्या प्रवाहाचीदेखील पुलांमुळे गैरसोय कमी झाली आहे. अर्थात यावेळेस गर्दी तशी नगण्यच होती. दर्शनार्थींना त्र्यंबकेश्वर मंदिराच्या पूर्व दरवाजाने प्रवेश मिळत होता. अनेकांना पेड दर्शनाबाबत माहिती नसल्याचे आढळून आले. त्यासाठी देवस्थान ट्रस्टने माहिती फलक लावावेत. अशी लोकांची सूचना आहे. कोणताही गैरप्रकार अगर अनुचित प्रकार न घडता भाविकांना दर्शन सुलभ झाले. देवस्थान मॅनेजर, विश्वस्त आणि कर्मचारी जातीने लक्ष देत होते. नगरपालिका मुख्याधिकारी तथा देवस्थान सचिव एन. एम. नागरे हेदेखील गर्दीचे नियोजन करून भाविकांची दर्शन व्यवस्था सुलभ करीत होते. (वार्ताहर)

Web Title: Trimbak on the first Monday, crowd of fifty thousand devotees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.