त्र्यंबक फेरी : ७०० पोलिसांचफे रीवर

By Admin | Updated: August 9, 2014 00:49 IST2014-08-09T00:45:54+5:302014-08-09T00:49:10+5:30

२४ तास गस्ता बंदोबस्त; सुरक्षिततेचा घेतला आढावा

Trimabak Ferry: 700 Police Rivers | त्र्यंबक फेरी : ७०० पोलिसांचफे रीवर

त्र्यंबक फेरी : ७०० पोलिसांचफे रीवर

नाशिक : त्र्यंबकेश्वरची तिसऱ्या श्रावणी सोमवारची फेरी म्हणजे पर्वणीच असते़ ‘बम बम भोले’चा जयघोष करत लाखो शिवभक्त ब्रह्मगिरीला फेरी मारतात़ या फेरीमध्ये वृद्ध, युवक व महिला तसेच पुरुष मोठ्या संख्येने सहभागी होतात़
या फे री मार्गात हुल्लडबाजी वा महिलांच्या सुरक्षिततेसाठी २४ तास पोलिसांची गस्त राहणार आहे़ रविवारी सकाळपासून त्र्यंबकेश्वर मंदिर, परिसर आणि फे री मार्गावर सुमारे ७०० पोलीस कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त तैनात केला जाणार आहे़
तिसऱ्या श्रावणी सोमवारी सुमारे तीन लाख भाविक दर्शनासाठी व फे रीसाठी येण्याची शक्यता असून, सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून ग्रामीण पोलीस अधीक्षक संजय मोहिते यांनी सुरक्षिततेचा आढावा घेतला आहे़
राज्य राखीव दलाच्या तुकड्यांसह शीघ्र कृती दलाचे जवान नियुक्त करण्यात येणार आहे़ त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरावर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर राहणार असून, बॉम्बशोधक पथकामार्फत तपासणीही केली जाणार आहे़ तसेच खासगी वाहने खंबाळे येथे थांबविण्यात येणार असून, केवळ राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसलाच प्रवेश देण्यात येणार आहे़ खासगी वाहनांना प्रवेश बंद असून अशा वाहनांवरही पोलिसांची करडी नजर राहणार आहे.

Web Title: Trimabak Ferry: 700 Police Rivers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.