शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

नाशिक विधान परिषदेत रंगणार तिरंगी लढत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2018 16:41 IST

विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून निवडणुकीसाठीच्या रिंगणातून दोन उमेदवारांनी माघार घेतल्यामुळे आता नाशिकमधून विधान परिषदेसाठी तिरंगी लढत होणार आहे. काँग्रेस पुरस्कृत म्हणून चर्चेत असलेले ज्ञानेश्वर गायकवाड यांनी व देवळा आघाडीचे अपक्ष उमेदवार अशोक अहेर यांनी सोमवारी (दि.7) निवडणुकीच्या मैदानातून माघार घेतली आहे.

ठळक मुद्देविधान परिषद निवडणुकीत तिरंगी लढत सहाणे, दराडे, कोकणी यांच्यात रंगणार चुरस कोकणी यांच्या उमेदवारीने निवडणुकीत रंगत

नाशिक : विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून निवडणुकीसाठीच्या रिंगणातून दोन उमेदवारांनी माघार घेतल्यामुळे आता नाशिकमधून विधान परिषदेसाठी तिरंगी लढत होणार आहे. काँग्रेस पुरस्कृत म्हणून चर्चेत असलेले ज्ञानेश्वर गायकवाड यांनी व देवळा आघाडीचे अपक्ष उमेदवार अशोक अहेर यांनी सोमवारी (दि.7) निवडणुकीच्या मैदानातून माघार घेतली आहे.विधान परिषद निवडणुकीत शिवसेना व भाजपची युती झालेली आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या निकटवर्तीय म्हणून ओळखले जाणारे परवेझ कोकणी यांच्यावर निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेण्यासाठी दबाव आणला जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती. परंतु कोकणी यांनी कोणत्याही दबावाला बळी न पडता आपला अर्ज काम ठेवल्याने पक्षीय बलाबल व बदलत्या राजकीय घडामोडींच्या पाश्र्वभूमिवर राष्ट्रवादीचे अ‍ॅड.शिवाजी सहाणे शिवसेनेचे नरेंद्र दराडे व अपक्ष परवेझ कोकणी यांच्यातच तिरंगी लढत बघायला मिळणार असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे. शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर अ‍ॅड. शिवाजी सहाणे राष्ट्रवादीच्या तिकिटावर निवडणुकीच्या रणधुमाळीत उतरले आहे. सध्याचे पक्षीय बलाबल पाहता स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत शिवसेनेचे पारडे जड वाटत असले तरी अ‍ॅड. सहाणे शिवसेनेत असताना त्यांना मानणारा एक गट होता. परंतु पक्षाने त्यांना तिक ीट नाकारल्यामुळे हा गट नाराज असून शिवसेना भाजपने युती केल्यानंतरही त्र्यंबक नगरपालिकेवर भाजपचा झेंडा फडकविण्यात महत्वाची भूमिका बजावणारे परवेझ कोकणी यांनी अपक्ष म्हणून अर्ज कायम ठेवला आहे. त्यामुळे युतीची काही मते विभागली जाण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसने अ‍ॅड. सहाणो यांना त्यांचे बेरजेचे राजकारण पाहून ऐणवेळी उमेदवारी जाहीर केली आहे. गत विधान परिषद निवडणुकीतही अ‍ॅड. सहाणे यांनी पक्षीय बलाबल तुलनेत कमी असताना आमदार जयंत जाधव यांना काट्याची टक्कर दिली होती. या पाश्र्वभूमीवर विधान परिषद निवडणुकीत शिवसेनेचे पारडे जड वाटत असतानाही कोकणी यांचा अर्ज कायम राहिल्याने या लढतीत चूरस निर्माण झाली आहे.

टॅग्स :ElectionनिवडणूकNashikनाशिकShiv SenaशिवसेनाNCPराष्ट्रवादी काँग्रेस