शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

नाशिक मध्ये हत्या झालेल्या ‘त्या’ वृक्षाला अर्पण केली श्रद्धांजली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2018 19:21 IST

या वृक्षहत्येत राजकीय व्यक्ती आणि नगरसेवक यांचा संबंध असल्याचा आरोप फादर डिमेलो यांनी केला आहे. संबंधितांनी हत्या केल्यानंतर आता ती का केली आणि अन्य तपशील बाहेर यावेत यासाठी शांततामयी मार्गाने सर्व प्रयत्न करणार आहेत. 

ठळक मुद्देशांततेसाठी झाली प्रार्थना सभा  ‘मुळा’पर्यंत पोहोचण्यासाठी पर्यावरणप्रेमी करणार उपोषण

नाशिक : वृक्ष निर्जीव नाहीत तर सजीव आणि परोपकारी आहेत. त्यांच्या हत्येचे समर्थन होऊ शकत नाही अशा शब्दात त्या वृक्ष हत्येचा तीव्र शब्दात निषेध करतानाच होली क्रॉस चर्चच्या जवळील त्या आम्रवृक्षाला श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. ‘वृक्ष’ हत्येच्या ‘मुळा’पर्यंत पोहोचण्यासाठी फादर वेन्सी डिमेलो आता उपोषण करणार आहेत.रविवारी (दि.१६) सायंकाळी झालेल्या या कार्यक्रमात हत्या झालेल्या वृक्षासाठी ख्रिश्चन धर्मातील विधीप्रमाणे प्रार्थना करून पवित्र जल त्या झाडाच्या समाधीस्थळावर शिंपडण्यात आले आणि त्यानंतर होली क्रॉस चर्चमध्ये श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

विशेष म्हणजे रविवारी जागतिक ओझोन दिन तर होताच, शिवाय ख्रिश्चन बांधवांचा पवित्र वधस्तंभाचा सणदेखील होता.

नाशिक शहरातील होलीक्रॉस चर्चलगतच असलेले हे झाड १९६७ साली स्पेन संतपुरुष फादर बारां को यांनी लावले होते. रस्त्याला व अन्य कोठेही अडथळा नसलेल्या या वृक्षाची गेल्या रविवारी रात्री अज्ञातांनी हत्या केली, अगदी मुळासकट झाड नष्ट करून त्यावर वाळू टाकण्यात आली आणि पुरावा नष्ट करण्याचादेखील प्रयत्न करण्यात आला. राष्टÑसेवा दलाचे कार्यक्रर्ते असलेल्या फादर वेन्सी डिमेलो यांनी यासंदर्भात व्हॉट््स अ‍ॅपवर आपल्या भावना व्यक्त करणारी पोस्ट टाकल्यानंतर रविवारी (दि.१६) सायंकाळी चर्चजवळील जागेत प्रार्थना सभा घेण्यात आली. तसेच तेथून सर्वांनीच वृक्षाच्या त्या समाधीस्थळी जाऊन पवित्र जल शिंपडून विधी पार पाडले. अपराध्यांना क्षमा कर, अशी विनवणी करण्यात आली. त्यानंतर चर्चमध्ये मौन बाळगून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. 

टॅग्स :Nashikनाशिकenvironmentवातावरण