शहीद पोलीस जवानांना श्रद्धांजली

By Admin | Updated: November 26, 2015 23:10 IST2015-11-26T23:09:21+5:302015-11-26T23:10:16+5:30

आयुक्तालय : शहीद चौकात वाहिली आदरांजली

Tribute to the martyred police jawans | शहीद पोलीस जवानांना श्रद्धांजली

शहीद पोलीस जवानांना श्रद्धांजली

नाशिक : २६ नोव्हेंबर २००८ मध्ये मुंबईत झालेल्या अतिरेकी हल्ल्यात शहीद झालेल्या पोलीस जवानांना श्रद्धांजली देण्यासाठी पोलीस आयुक्तालयातर्फे गंगापूररोड येथील शहीद चौकात आदरांजली वाहण्यात आली.
यावेळी पोलीस आयुक्त एस. जगन्नाथन, पोलीस उपायुक्त एन. अंबिका, विजय पाटील, सहायक पोलीस आयुक्त विजय पाटील,
राजू भुजबळ, अतुल झेंडे यांनी श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी पोलीस निरीक्षक सुरेश सपकाळे, हेमंत सोमवंशी, शांताराम अवसरे तसेच महापौर अशोक मुर्तडक,
उपमहापौर गुरुमित बग्गा, आमदार देवयानी फरांदे, आमदार सीमा हिरे, आमदार जयंत जाधव आदि उपस्थित होते. (प्रतिनिधी)

Web Title: Tribute to the martyred police jawans