सोशल मीडियावर दिलीप कुमार यांना श्रद्धांजली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2021 04:10 IST2021-07-09T04:10:31+5:302021-07-09T04:10:31+5:30

शिष्यवृत्ती अर्जासाठी १५ जुलैपर्यंत मुदतवाढ अतिक्रमणाची गाडी आल्याने धावपळ नाशिक : जेलरोड येथे सकाळी ११ वाजताच्या सुमारास मनपाचे अतिक्रमण ...

Tribute to Dilip Kumar on social media | सोशल मीडियावर दिलीप कुमार यांना श्रद्धांजली

सोशल मीडियावर दिलीप कुमार यांना श्रद्धांजली

शिष्यवृत्ती अर्जासाठी १५ जुलैपर्यंत मुदतवाढ

अतिक्रमणाची गाडी आल्याने धावपळ

नाशिक : जेलरोड येथे सकाळी ११ वाजताच्या सुमारास मनपाचे अतिक्रमण विरोधी पथक दाखल झाल्याने भाजी विक्रेत्यांची धावपळ उडाली. रस्त्यावर बसलेल्या विक्रेत्यांना ध्वनिक्षेपकावरून दुकाने हटविण्याचे आवाहन केले जात होते. त्यामुळे विक्रेत्यांना दुकाने सावरण्यासाठी वेळ मिळाल्याने त्यांचे नुकसान वाचले.

चौकात पोलीस दिसू लागले

नाशिक: मनपाच्या बससेवेचा शुभारंभ असल्याने नाशिकमध्ये चार मंत्री दाखल झाले होते. त्यामुळे गुरुवारी शहरातील महत्त्वाच्या चौकांमध्ये वाहतूक पोलीस तैनात करण्यात आल्याचे दिसत होते. त्यामुळे नेहमीच वाहतू कोंडी होणाऱ्या चौकांमधील वाहतूक सुरळीत सुरू हेाती. त्यामुळे नागरिकांनाही दिलासा मिळाला.

दहिपुलावरील खोदकामाचा वाढला धोका

नाशिक : स्मार्ट सिटी कामासाठी खोदण्यात आलेल्या दहीपुलावरील रस्ता पावसाळ्यात अधिक धोकादायक ठरू शकतो. या रस्त्याचे काम अजूनही पूर्ण झाले नसल्याने पावसाळ्यात कामाचा कालावधी अधिक वाढण्याची शक्यता आहे. खड्ड्यांमध्ये पाणी साठल्यामुळे अपघाताचाही धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे येथील कामकाज पूर्ण करण्याची मागणी होत आहे.

शाळांमधून साहित्य वाटपाला सुरुवात

नाशिक: शैक्षणिक वर्ष ऑनलाईन सुरू झाले असले तरी शाळांकडून विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वितरित करण्यात येत आहे. पालकांना शाळेत बाेलावून शैक्षणिक साहित्य वाटप केेले जात आहे. यंदा पाठ्यपुस्तकांसाठी जादा रक्कम आकारण्यात आल्याचे पालकांकडून बोलले जात आहे.

प्रभाग सभापतीच्या हालचाली गतिमान

नाशिक: नाशिकरोड येथील प्रभाग सभापतीपदासाठी हालचाली गतिमान झाल्या आहेत. नाशिकरोडला शिवसेना व राष्ट्रवादी काॅंग्रेस यांची महाविकास आघाडी आहे. मात्र सभापतीपदासाठी या दोन्ही पक्षांकडून दावे केले जात आहेत. यंदा राष्ट्रवादीचा सभापतीपदावर दावा आहे.

Web Title: Tribute to Dilip Kumar on social media