निफाडला भाई वैद्य यांना श्रद्धांजली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2018 00:12 IST2018-04-06T00:12:32+5:302018-04-06T00:12:32+5:30

निफाड : राष्ट्र सेवा दलाचे माजी अध्यक्ष, राज्याचे माजी गृहराज्यमंत्री भाई वैद्य यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी निफाड येथील वैनतेय विद्यालयात शोकसभा घेण्यात आली.

Tribute to brother Vaidya in Niphadla | निफाडला भाई वैद्य यांना श्रद्धांजली

निफाडला भाई वैद्य यांना श्रद्धांजली

निफाड : राष्ट्र सेवा दलाचे माजी अध्यक्ष, राज्याचे माजी गृहराज्यमंत्री भाई वैद्य यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी निफाड येथील वैनतेय विद्यालयात शोकसभा घेण्यात आली. याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते वि. दा. व्यवहारे म्हणाले की, भाई वैद्य हे साध्य आणि साधनसुचिता पाळणारे एक थोर समाजवादी विचारवंत होते. निफाड आणि भाई वैद्य यांचे अतूट नाते होते. निफाडमध्ये सेवा दलाची चळवळ पुढे नेणे हीच त्यांना श्रद्धांजली ठरेल. याप्रसंगी अशोक कापसे, दिलीप वाघवकर, दत्ता उगावकर, बा. बा. गुंजाळ, दीपक श्रीवास्तव, संजय अहेर आदी मान्यवरांचीही भाषणे झाली. या शोकसभेस निफाडचे नगरसेवक राजाभाऊ शेलार, डॉ. उत्तम डेर्ले, मधुकर राऊत, प्राचार्य मालती वाघवकर, कचेश्वर दुसाने, संपत कराड, तानाजी दराडे आदींसह नागरिक उपस्थित होते. याप्रसंगी भाई वैद्य तसेच निफाडच्या उपनगराध्यक्ष मंगल वाघ, सेवा दलाचे सैनिक सुकदेव ढगे यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

Web Title: Tribute to brother Vaidya in Niphadla